HOME   लातूर न्यूज

पोद्दार हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त १७५ रूग्णांची तपासणी

मोफत औषधी वाटप, २० वर्षांपासून अशाच सामाजिक उपक्रमांचे आयोजन


पोद्दार हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त १७५ रूग्णांची तपासणी

लातूर: येथील पोद्दार ऍक्सिडेंट ऍण्ड ट्रामा सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष तपासणी वैद्यकीय कार्यक्रमात १७५ रूग्णांच्या वेगवेगळ्या तपासण्या करून त्यांना मोफत औषधींचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी वाले इंग्लीश स्कूलचे प्राचार्य चंद्रशेखर भोगडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश भट्टड, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अशोक पोद्दार, प्रसाद उदगीरकर, लक्ष्मीकांत कर्वा, माजी उपमहापौर कैलास कांबळे, विजय रांदड, ओमप्रकाश पोद्दार आदिंची उपस्थिती होती. पोद्दार हॉस्पिटलच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या विशेष वैद्यकीय कार्यक्रमात ९६ रूग्णांच्या हाडांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. ४८ रूग्णांचे एक्सरे काढण्यात आले. ३१ रूग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. अशा एकूण १७५ रूग्णांची डॉ. अशोक पोद्दार यांनी तपासणी केली. या रूग्णांना मोफत औषधी इतरण करण्यात आल्या. यावेळी रूग्णांना व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला. पोद्दार हॉस्पिटल गेल्या दोन दशकापासून सामाजिक भावनेतून कार्यरत आहे. या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत ९९ मोफत तपासणी, उपचार शिबिरे घेऊन रूग्णांना मोफत औषधी देण्यात आली. लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती व स्मृतीदिनी मोफत शिबिर घेतले जाते. या रूग्णसेवेचे प्राचार्य चंद्रशेखर भोगडे, डॉ. सुरेश भट्टड आदिंनी कौतुक करून या रूग्ण सेवेच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.


Comments

Top