HOME   लातूर न्यूज

विलास साखर कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार

वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटकडून सन्मान, कारखान्याला मिळालेला २६ वा पुरस्कार


विलास साखर कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार

लातूर: २०१७-१८ च्या गळीत हंगामासाअठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने मानाचा ऊत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार विलास सहकारी साखर कारखान्याला जाहीर केला आहे. कारखान्यास मिळालेला हा २६ वा पुरस्कार असून सहकार क्षेत्रात एक विक्रम प्रस्थापीत झाला आहे. विलास सहकारी साखर कारखान्यास हा पुरस्कार १५ डिसेंबर २०१८ रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. पुणे येथे होणाऱ्या भव्य सोहळयात राज्यातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. लातूरच्या सर्वांगीण विकासात मांजरा परिवाराचे उल्लेखनीय योगदान आहे.
कारखान्याने मागच्या गळीत हंगामात ऊसाचे ०६ लाख ०५ हजार मेटन गाळप करून ०६ लाख ९१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले व सरासरी साखर उतारा ११.४२ टक्के मिळवला. गळीत हंगामात पूर्ण कार्यक्षमतेचा वापर केला. हंगामात पाण्याची बचत करून पाण्याचे पुनर्वापर केले. ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेचा कार्यक्षमतेने वापर केला. हंगामात कारखाना बंद राहणार नाही यांची काळजी घेतली. इंधन वापर कमी करून उपपदार्थ प्रक्रीया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले. या सर्व कामाची पडताळणी करून कारखान्याची या पारीतोषिकासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून निवड करण्यात आली. कारखान्यास या आधी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था’, ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’, ‘सहकार भूषण’, ‘उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता’, ‘उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन’, ‘उत्कृष्ट ऊस विकास’, ‘सहकारनिष्ठ पारितोषिक’, ‘सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक’, ‘सर्वोत्कृष्ट चिफ अकौटंट’ असे २५ पारितोषिके मिळाली आहेत. या पारितोषिकामुळे कारखान्यास सोळा वर्षात २६ पारितोषिके प्राप्त झाली आहेत. हा पुरस्कार कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, सर्व संचालक मंडळ व प्रभारी कार्यकारी संचालक एस. व्ही. बारबोले स्विकारणार आहेत. याबददल माजी मंत्री दिलीपराव देशमुख व संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
या पुरस्काराबद्दल संस्थापक चेअरमन, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कारखाना स्थळी भेट देऊन सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कामगार, ऊसतोडणी व ऊस वाहतुक ठेकेदार यांचे अभिनंदन केले. चालू गळीत हंगामातील ऊस गाळपाची माहिती घेतली. कारखाना अधिकाधिक कार्यक्षतेने चालवण्याच्या सुचना सर्वांना केल्या.


Comments

Top