logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   लातूर न्यूज

रेणापूर भाजपा अल्पसंख्यांक आघाडीची कार्यकारिणी जाहीर

रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप

रेणापूर भाजपा अल्पसंख्यांक आघाडीची कार्यकारिणी जाहीर

लातूर: रेणापूर तालुक्यामधील भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी गावा-गावातील कार्यकर्त्यांना भाजपा अल्पसंख्यांक आघाडीमध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, प्रसिध्दी प्रमुख, सदस्य पदी बुधवारी सहभागी करुन घेवून कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. या पदाधिकाऱ्यांना लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते लातूर येथे नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
रेणापूर भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या उपाध्यक्ष पदी तय्यब शेख, अफसर शेख, सरचिटणीस पदी महेबुब शेख, मजनौदिन शेख, अशीफ सय्यद, शहादुल्ला सय्यद, कुतुबोदिन मुल्ला, शिकंद शेख, मौला सय्यद, फतरु तासेवाले, इसुफ शेख, अल्लाबक्ष शेख, कोषाध्यक्ष पदी याकुब शेख, अशिफ शेख, मुस्तफा तासेवाले व प्रसिध्दी प्रमुख पदी अलिम शेख, रसुल शेख, गफुर शेख, अजमखाँ पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर रेणापूर तालुक्यातील गावा-गावातील तरुणांची भाजपा युवा मोर्चाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांना भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून सत्कार केला व पुढील कार्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांना रमेशअप्पा कराड यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय क्षीरसागर, भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष ॲङ दशरथ सरवदे, लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, रेणापूर पसचे सभापती अनिल भिसे, जि. प. सदस्य सुरेश लहाने, रेणापूर युमोचे तालुकाध्यक्ष नरसिंग येलगटे, अल्पसंख्यांक आघाडीचे रेणापूर तालुकाध्यक्ष जलिल शेख, गोविंद नरहरे, संतोष चव्हाण, शामसुंदर वाघमारे, सुरज शिंदे, विस्तारक दिलीप पाटील, वसंत करमुडे, रमेश सोनवणे, सतिश अंबेकर, भैरवनाथ पिसाळ, बन्शी भिसे, विजय चव्हाण, उज्जल कांबळे, अंतराम चव्हाण, अभिजीत मद्दे, शिवाजी उपाडे, पांडूरंग बालवाड, संजय डोंगरे, लक्ष्णम खलंग्रे, रमाकांत फुलारी, विठ्ठल कसपटे, सौ. लता भोसले, सौ. सुरेखा पुरी, सौ. ललिता कांबळे, प्रदिप राठोड, अनंत कणसे, मारोती गालफाडे यांच्यासह रेणापूर तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top