logo
news image पंतप्रधानांना भेटायला जाणार्‍या तृप्ती देसाईंना पुण्यात अटक news image पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक news image राखी सावंतच्या विरोधात भीम आर्मीनं केला खटला दाखल news image ऊसतोड कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणार- पंकजा मुंडे news image सर्वे बघून निवडणुकीची तिकिटे मिळत नाहीत, माणसं बघून तिकिटे मिळतात- पंकजा मुंडे news image मारुती महाराज कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आ. अमित देशमुख यांच्या आज दोन सभा news image पावसाचा मुंबई आणि कोकणाला जोरदार तडाखा news image माथेरानची मिनी ट्रेन आजपासून होणार सुरु news image पंतप्रधान आज शिर्डीत साईबाबा शताब्दी सोहळ्यात होणार सहभागी news image आधार कार्डामुळे मोबाईल बंद होणार नाहीत news image राम मंदीर बांधता येत नसेल तर आम्हाला सांगा- उद्धव ठाकरे news image २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे news image भगवानबाबांच्या सावरगावात दरवर्षी दसरा मेळावा होणार- पंकजा मुंडे news image बीडमध्ये नव्याने भगवानगड उभारणार- पंकजा मुंडे

HOME   लातूर न्यूज

आ. दिलीपरावांच्या हस्ते साखरेचे पूजन

चालू हंगामात एक लाख एक हजार एकशे अकरा पोती साखरेचे उत्पादन

आ. दिलीपरावांच्या हस्ते साखरेचे पूजन

लातूर: लोकनेते विलासराव देशमुख यांच्या अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या जिवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणणार्‍या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगातील उत्पादित ०१ लाख ०१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन आ. दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपती काकडे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, व्हा. चेअरमन सर्जेराव मोरे, जागृती साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन लक्ष्मणराव मोरे, जिल्हा बँकेचे संचालक नाथसिंह देशमुख, संभाजी सूळ, संभाजी रेड्डी, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, आदींची उपस्थिती होती. मागील दोन वर्षापासून समाधानकारक पाऊस झालयाने मोठया प्रमाणात ऊसाची लागवड शेतकरी बांधवांनी केली आहे. ऊसाचे गाळप मोठया प्रमाणात करुन, गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी चेअरमन आ. दिलीपराव देशमुख व संचालक आ. अमित देशमुख यांनी योग्य ते नियोजन केले आहे. सर्व संचालक मंडळ व प्रशासन देखील जास्तीत जास्त ऊस गाळपाच्या बाबतीत प्रयत्नशील असून, या कारखान्याने सरासरी साखर उतारा ०९.५५ टक्के मिळवला आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून ५८,४७,००० केव्ही वीज निर्मिती केली आहे.


Comments

Top