logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   लातूर न्यूज

रमेशप्पांना आमदार करा; विकासाची गंगा अवतरेल

लातूर ग्रामीण भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ना. पंकजाताई मुंडे यांचा विश्वास

रमेशप्पांना आमदार करा; विकासाची गंगा अवतरेल

लातूर: केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले असून समाजातील सर्वच घटकासह गोर-गरिब जनतेला मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. या जनहिताच्या कामाच्या बळावरच पुन्हा भाजपा सत्तेत येणार आहे. रमेशअप्पा कराड यांनी आमदार नसताना कोट्यावधीची कामे लातूर ग्रामीण मतदार संघासाठी मंजूर करुन घेतली, जर रमेशप्पा आमदार असते तर यापेक्षाही अधिक निधी आणून विकासाला मोठी गती दिली असती. तेव्हा येत्या काळात रमेशअप्पांना साथ द्या, आमदार करा निश्चितच या भागात विकासाची गंगा अवतरल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामाचे लोकार्पण आणि भूमीपूजन सोहळा लातूर तालुक्यातील मौजे चिंचोली ब. येथे ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सोमवारी झाला. त्यानंतर आयोजित भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ना. मुंडे बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर हे होते. यावेळी मेळाव्याचे संयोजक भाजपा नेते रमेशअप्पा कराड, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, आ. विनायकराव पाटील, आ. सुधाकर भालेराव, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिपचे अध्यक्ष मिलींद लातूरे, गंगाखेड शुगर मिल्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे, जिप बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, महिला व बालकल्याण सभापती संगीता घुले, माजी सभापती दिलीपराव देशमुख यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. तब्ब्‍ल तिन तास उशीराने मेळावा सुरु होवूनही हजारोंचा जनसमुदाय थंडीच्या वातावरणात कायम होता. नेत्यांच्या घोषणाबाजीने चिंचोलीचा परिसर दुमदुमुन गेला होता. या मेळाव्यात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.
पुढे बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या, लातूर जिल्ह्यासाठी गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून देण्यात आलेल्या ४४७ कोटी रुपयांपैकी तब्बल ११८ कोटी रुपये लातूर ग्रामीण मतदार संघासाठी देण्यात आले. आमदार नसताना ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी रमेशप्पांनी खेचून आणला, जर रमेशप्पा आमदार असते तर या भागाच्या विकासाला मोठी गती मिळाली असती. काँग्रेसच्या ५० वर्षापेक्षा अधिक कामे ०४ वर्षात भाजपा सरकारने केली असून
लोकनेते गोपिनाथराव मुंडे साहेबांनी रेणापूर मतदार संघातील अर्धा भाग रमेशअप्पांना तर अर्धा माझ्याकडे दिला आहे. या मतदार संघात रमेशअप्पा कराड यांनी प्रस्थापितांच्या विरोधात लढा देत तरुणांची मोट बांधुन गावा-गावात भाजपाला मजबूत केले आहे. असे सांगुन ना. मुंडे म्हणाल्या की, येणाऱ्या निवडणूकीत भाजपा सरकारने केलेल्या विकास कामाच्या बळावर पुन्हा केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार येणार यात शंका नाही. तेव्हां मागील काळात झालेली चुक आता होणार नाही याची काळजी घेवून विकासाची दृष्टी असलेल्या रमेशप्पांना भक्कम साथ देवून विधानसभेत पाठवा असे आवाहन केले.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती संगीता घुले यांनी आपले विचार मांडले तर प्रारंभी लातूर ग्रामीण विधानसभा प्रमुख अनिल भिसे यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे यांनी आभार मानले. या मेळाव्यास अमोल पाटील, विजय क्षीरसागर, ॲङ दशरथ सरवदे, जि.प. सदस्य अशोक केंद्रे, प्रिती शिंदे, मनिषा वाघमारे, अरुणा शिंगडे, सुरेश लहाने, महेश पटील, सुधाकर श्रृंगारे, अभिषेक अकनगिरे, अनंत चव्हाण, साहेबराव मुळे, वसंत करमुळे, श्रीकिशन जाधव, डॉ. बाबासाहेब घुले, विशाल शिंगडे, सुरज शिंदे, शामसुंदर वाघमारे, विश्वास कावळे, बन्शी भिसे, अनंत कणसे, सतिश अंबेकर, बालाजी दुटाळ, रमेश सोनवणे, भैरवनाथ पिसाळ, तात्याराव बेद्रे, धनराज शिंदे, प्रताप पाटील, विनायक मगर, गोविंद नरहरे, राजकिरण साठे, हनुमंत नागटिळक, सोमनाथ पावले, अनंत कणसे, महेश कणसे, वैजनाथ हराळे, काशीनाथ ढगे, प्रभाकर माळी, लता भोसले, ललिता कांबळे, सुरेखा पुरी, रशिद पठाण, श्रीकृष्ण मोटेगावकर, फुलचंद अंधारे, सचिन सवई, विनायक मगर, विजय चव्हाण, लक्ष्मण खलंग्रे, नरसिंग येलगटे, श्रीमंत नागरगोजे, पद्माकर चिंचोलकर, भाऊसाहेब गुळभिले, गोविंद जाधव, लहु नांदे, सचिन कुलकर्णी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनीधी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख व महिला, पुरुष हजारोंच्या संख्येनी उपस्थि होते.


Comments

Top