• 20 of March 2018, at 1.05 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी

पिडीत तरुणी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी

लातूर: विद्यार्थी व गुरू यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व सर्वोपचार रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागाचे विभाग प्रमुख गिरीश ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनीसोबत घाणेरडे वर्तन करणार्‍या या डॅक्टरवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘लष्कर-ए-भिमा’ या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. डॅक्टरला निलंबित नाही केल्यास लष्कर-ए-भिमा संघटनेच्या वतीने तीव्र अंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी पिडीत तरूणीसह लष्कर-ए-भिमा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रणधीर सुरवसे, संजय काळे, एकबाल शेख, अजय सूर्यवंशी, संतोष सरकाळे, शैलेश कांबळे, प्रशांत काबंळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
आर्यन सेनेनंही दिले निवेदन
महाराष्ट्र आर्यन सेनेनंही अशाच प्रकारची मागणी केली आहे. नाक, कान, घसा तज्ञ डॉ. गिरीश ठाकूर यांनी आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा विनयभंग करुन अब्रुचे धिंडवडे काढले आहेत. गुरु शिष्याच्या नात्याला हा काळीमा फासणार प्रकार आहे असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी डॉ. गिरीश ठाकूर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गोरे यांना दिले आहे.


Comments

Top