HOME   लातूर न्यूज

स्व. दगडोजीराव देशमुख अश्वस्पर्धा-2019 ची सांगता

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण


स्व. दगडोजीराव देशमुख अश्वस्पर्धा-2019 ची सांगता

माळेगाव : देशभरात प्रसिध्द असलेली व उज्ज्वल परंपरा लाभलेली माळेगाव यात्रा प्रति वर्षाप्रमाणे पार पडली. ज्यामध्ये सर्वांचे आकर्षण ठरली ती म्हणजे श्री खंडोबा अश्वस्पर्धा-2019 या अश्व स्पर्धेत मोठ्या प्रमाणात अश्व पालकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती. देश पातळीवरील ही संस्था अश्वाच्या पालन-पोषणपासून त्यांच्या देखभालीसाठी सातत्याने काम करत आली आहे.
माळेगाव यात्रेतील अश्व स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून स्व.दगडोजीराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री खंडोबा अश्वस्पर्धा-2019 ही स्पर्धा आयोजित केली गेली.
मारवाडी मादी प्रथम रुक्मीणी (अश्व मालक सुशिल/शशांक हगौणे), मारवाडी मादी द्वितीय सोनी (अश्व मालक दिलीपराव देशमुख), मारवाडी मादी तृतीय कृष्णा (अश्व मालक हंसराज अप्पाराव पाटील), मारवाडी नर प्रथम सुर्यदेव (अश्व मालक खंडू कलाटे), मारवाडी मादी द्वितीय देवराज (अश्व मालक दिलीपराव देशमुख), मारवाडी मादी तृतीय स्वक्ष (अश्व मालक धिरज विलासराव देशमुख), नुकरा मादी प्रथम दामिनी (अश्व मालक धीरज विलासराव देशमुख), नुकरा मादी द्वितीय राणी (अश्व मालक गोपाळ रंगभाळ), नुकरा मादी तृतीय लक्ष्मी (अश्व मालक सुरेश चिंचसुरे), नुकरा नर प्रथम राजा (अश्व मालक दिनेश सहाणे), नुकरा नर द्वितीय अदाम (अश्व मालक अतिक खतिब मोहम्मद), नुकरा नर तृतीय खडक सिंग (अश्व मालक सरबजितसिंग गादीवाले), आदंत नर प्रथम चेतक (अश्व मालक संजय अप्परगंड), आदंत नर द्वितीय गुलजर (अश्व मालक अजय देशपांडे), आदंत मादी प्रथम कोहीनूर (अश्व मालक रुपेश थोरमोटे), आदंत मादी द्वितीय राणी (अश्व मालक अमोल विजयकुमार लोमटे), आदंत मादी तृतीय ऐश्वर्या (अश्व मालक नारायणराव नरहरी पावडे), यामध्ये प्रथम येणा­यास २१ हजार रु., द्वीतीय येणा­यास १५ हजार रु., व तृतीय येणा­यास ११ हजार रु. अशा स्वरुपाचे बक्षीस देण्यात आले.
सदरील बक्षीस महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, एस.आर. देशमुख, आबासाहेब पाटील, श्रीपतराव काकडे, सर्जेराव मोरे, श्रीशैल्य उटगे, लक्ष्मण मोरे, विजय देशमुख, गणतपराव बाजुळगे, पृथ्वीराज सिरसाठ, शाम भोसले, चाँदपाशा इमानदार, संभाजी सुळ, संभाजी रेडडी, स्नेहल देशमुख, राजेसाहेब सवई, विजय निटुरे, प्रदीप राठोड, प्रशांत घार, बादल शेख, पंडीत ढमाले, सुपर्ण जगताप, सचीन दाताळ, बालाजी साळुंके समीर राठी, जितेंद्र पाहाडिया, जितेंद्रसिंग, मनप्रितसिंग, मयुर धवन पाटील, आदींची उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी धीरज देशमुख, जितेंद्र पहाडीया, समीर राठी, मयुर धवन, जिशान खोरीवाले यांचे मोलाचे योगदान राहीले.


Comments

Top