HOME   लातूर न्यूज

निवळीच्या शेतकर्‍याचा दोन एकरातील ऊस जळाला

किमान दोन लाखांचे नुकसान, द्वेषातून आग लावल्याचा संशय


निवळीच्या शेतकर्‍याचा दोन एकरातील ऊस जळाला

लातूर: निवळी येथील शेतकरी संजय गोविंदराव माने यांचा गावालगत असलेला ०२ एकर ऊस अचानक लागलेल्या आगीमुळे जळाला आहे. या आगीमुळे त्यांचे ऊसासह शेतीतील ठिबक, पाईप व शेतीउपयोगी साहित्य जळाले आहे. यामुळे अगोदरच दुष्काळ आणि त्यात या संकटामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊसासह सर्व साहित्य जळाल्यामुळे ०२ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. शेतीलगत विदयुत तार नाही, कोणतीही ज्वलनशील वस्तू नाही तरी देखील आग लागल्यामुळे अज्ञात व्यक्तिने व्देष बुद्धीने हा प्रकार केला असल्याचा संशय शेतकरी संजय माने यांनी व्यक्त केला आहे.
निवळी येथील शेतकरी संजय माने यांचा कोसी ३१०२ जातीचा ०५ एकर ऊस तोडणी कार्यक्रमात आला होता. पण अचानक बुधवार १६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता ऊस पेटला. यावेळी ताबडतोब विलास सहकारी साखर कारखाना आग्नीशामनने पेटलेला ऊस विझवला. यामुळे ऊर्वरीत ऊसासह अनेक शेतकऱ्यांचा ऊस वाचला आणि मोठा अनर्थ टळला. या आगीमध्ये ०२ एकर ऊसासह, ठिबक, पाईप व शेती उपयोगी साहित्‍य जळाल्याने शेतकरी संजय माने यांचे ०२ लाखाचे नुकसान झाले आहे. या शेतावरून विजेची तार जात नाही, कोणत्याही स्वरूपाची आग त्या ठिकाणी नव्हती तरी देखील ऊस पेटल्याने या बददल सर्वजण शंका व्यक्त करीत आहेत. अशा प्रकारच्या व्देष बुध्दीने घटना घडू नयेत यासाठी समाज माध्यमातून देखील शेतकरी माने यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.


Comments

Top