HOME   लातूर न्यूज

बालाजी मंदिर आगामी धार्मिक पर्यटनस्थळ

आ. अमित देशमुखांनी दिली २० लाखांची देणगी, आज केली विधिवत पूजा


बालाजी मंदिर आगामी धार्मिक पर्यटनस्थळ

लातूर: लातूर येथील प्रसिद्ध असलेले श्री व्यंकटेश बालाजी मंदिर आगामी काळात धार्मिक पर्यटनस्थळ म्हणुन उदयास येईल असे माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, आज सकाळी बालाजी मंदिरास भेट देऊन मंदिर बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर मंदिरात जाऊन विधिवत पूजा अर्चा केली. श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या बांधकामासाठी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी २० लाख रुपयाची देणगी दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या बांधकामाची रचना, नक्षीकाम, बागबगीचा, विविध सत्संगाचे आयोजन, संताचे कीर्तन-भजन आणि शुभकार्यासाठी लोकांना जागा उपलब्ध आहे. भक्ताची मोठी गर्दी येथे असते यामुळे आगामी काळात हे मंदिर मराठवाड्यातील धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून उदयास येईल. याकरीता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगीतले.
यावेळी उदयोजक रमेश राठी, लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईज शेख, विरोधी पक्षनेते दीपक सूळ, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, माजी नगरसेवक नरेंद्र अग्रवाल, प्रकाश कासट, तालुकाध्यक्ष दगडूसाहेब पडिले, मंदिराचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, व्हा.चेअरमन गोविंद बोराडे, उपाध्यक्ष पांडुरंग मुंदडा, सचिव विनोद अग्रवाल, सहसचिव संजय बियाणी, राजेंद्र बाहेती, अनिल राठी व कार्यकारी मंडळ अध्यक्ष कांताप्रसाद राठी, गिरिधारीलाल जोशी, जुगलकिशोर गिल्डा, विष्णुकुमार कलंत्री, कमाल जोधवाणी यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.


Comments

Top