• 20 of March 2018, at 12.58 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

सेवालयानं सादर केला ‘हॅपी म्युझिक शो’

४२ वा प्रयोग, एड्स जनजागृतीचा सातत्याने प्रयोग

सेवालयानं सादर केला ‘हॅपी म्युझिक शो’

लातूर: जागतिक एड्स निर्मूलन दिवसाचे औचित्‍य साधून त्‍याच्‍या पूर्वसंधेला लातूर शहर महानगपालिका व सेवालय हासेगाव यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सेवालयातील मुलांच्‍या हॅपी म्‍युझीक शो या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमात मुलांनी आपल्‍या कलाविष्‍काराचे प्रदर्शन केले. रसिक प्रेक्षकांनी त्‍यांना दाद दिली. २००७ पासून सेवालय एड्स जनजागृतीवर कार्यक्रम राबवित आहे. यामध्‍ये हॅपी म्‍युझिक शो या कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून जनजागृती करण्‍याचा प्रयत्‍न चालू आहे. या कार्यक्रमाच्‍या ४२ व्‍या प्रयोगाचे आयोजन लातूर शहर महानगरपालिकेच्‍या वतीने करण्‍यात आले होते. महापौर सुरेश पवार, आयुक्‍त अच्‍युत हंगे व सेवालयाचे रवी बापटले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमात मुलांनी गणेश वंदन, गोंधळ गीत, धनगर गीत, पोवाडा, गवळण, पिंगा, लावणी व देशभक्‍तीपर गीतांवर आपला नृत्‍याविष्‍कार सादर केला. कार्यक्रमाची सांगता राष्‍ट्रगिताने करण्‍यात आली. कार्यक्रमास सभागृह नेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, रागिणी यादव, श्‍वेता लोंढे, शिवकुमार गवळी, देवानंद साळुंके, वर्षा कुलकर्णी, शितल मालू, दिपा गिते, हणमंत जाकते, गीता गौड, शोभा पाटील, जान्‍हवी सूर्यवंशी व तबरेज तांबोळी, रघुनाथ मदने, गणेश गोमचाळे, अॅड. वैशाली यादव, रमाकांत पिडगे, रूक्‍मानंद वडगावे व शहरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्‍योतीबा बडे यांनी केले.


Comments

Top