logo
news image आज जागतिक पुस्तक दिन, आपलं एक तरी पुस्तक लिहावं, वाचनाची गोडी लावावी news image लोकसभेसाठी तिसर्‍या टप्प्यात आज ११७ मतदारसंघात मतदान news image महाराष्ट्रात १४ ठिकाणी मतदान, अजित पवारांनी मातोश्रींसह केलं मतदान news image मतदान कार्ड अतिरेक्यांच्या आयईडी पेक्षा शक्तीशाली- मोदी news image आईचं दर्शन घेऊन नरेंद्र मोदींनी केलं अहमदाबादेत मतदान, अमित शाहही होते news image जालन्यात अनेक मतदान केंद्रात इव्हीएम मशीनमध्ये बिघाड news image उदयनराजे यांनी औक्षण घेऊन केलं मतदान news image साध्वी प्रज्ञासिंहांचे पंतप्रधानांनी केलेले समर्थन चिंताजनक- शरद पवार news image श्रीलंकेत सापडले आणखी ८७ बॉंब, तौहिद संघटनेवर शंका news image चौकीदार चोर है, राहूल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयात माफी news image अण्वस्त्रे दिवाळीसाठी नाहीत, पंतप्रधानांच्या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक news image विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी देणार नव्या चेहर्‍यांना संधी

HOME   लातूर न्यूज

मनपा कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

अत्यावश्यक सेवाही होणार ठप्प, वेतन प्रश्नी आक्रमक

मनपा कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

लातूर: लातूर महानगरपालिकेत वर्ग दोन, तीन आणि चार श्रेणीतील कर्मचार्‍यांनी बेमुदत संपाची हाक दिली असून आठ फेब्रुवारीपासून संपाला सुरुवात होणार आहे. यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचाही समावेश असेल अशी माहिती कर्मचारी संघटनेनं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मनपा कर्मचार्‍यांच्या कसल्याही समस्यांकडे लक्ष देत नाही, मागण्यांकडे डोळेझाक केली जाते, आजवर कुठल्याही प्रश्नी न्याय मिळाला नाही. कर्मचार्‍यांचे दोन महिन्यांचे थकलेले वेतन तात्काळ द्यावे, सेवा निवृत्त कर्मचार्‍यांचे निवृत्ती वेतन प्रत्येक महिन्याच्या ०१ तारखेला द्यावे, सहाय्यक अनुदान मिळत नसेल तर मनपाची नगरपालिका करावी, कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम तात्काळ संबंधितांच्या खात्यावर जमा करावी. या मागण्या मान्य न झाल्यास होणार्‍या परिणामांना मनपा जबाबदार असेल असेही म्हटले आहे.


Comments

Top