HOME   लातूर न्यूज

गोजमगुंडे एकांकिका स्पर्धेत रवीशंकर शाळा प्रथम


गोजमगुंडे एकांकिका स्पर्धेत रवीशंकर शाळा प्रथम

लातूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इकोफोक्स संस्था मुंबई, गरवारे कम्युनिटी सेंटर औरंगाबादचे बालभवन आणि जनरंग अकादमी लातूर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगकर्मी श्रीराम गोजमगुंडे पर्यावरण एकांकिका स्पर्धेत लातूर जिल्हास्तरावर श्रीश्री रविशंकर इंग्रजी माध्यम शाळेच्या संघाने सादर केलेल्या बाजीराव मस्तानीची काशी या एकांकिकेस प्रथम तर विलासराव देशमुख फाऊडेशन द्वरा संचलीत गोल्ड क्रिस्ट हाय इंग्लीश स्कूलच्या संघाने सादर केलेल्या वेस्ट मॅनेजमेंट या एकांकिकेस द्वीत्तीय तर जिल्हा परिषद शाळा कातपूरच्या संघाने सादर केलेल्या पर्यावरण वाचवा या एकांकिकेस तृतीय क्रमांक मिळाला.
लातूरच्या दगडोजीराव दादा देशमुख सांस्कृतिक सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण लक्ष्मी अर्बन बँकेचे चेअरमेंन अशोक उर्फ गटुसेठ अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे परीक्षक अनिरूद्ध जंगापल्ले, कल्याण वाघमारे, आर.बी.महाजन यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांसह महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लातूर येथे विजेते ठरलेले दोन संघ औरंगाबाद येथे आयोजित मराठवाडा स्तरीय पर्यावरण स्पर्धेसाठी पात्र ठरल्याची माहिती स्पर्धा संयोजक दिपरत्न निलंगेकर यांनी बक्षीस वितरण सोहळ्यात दिली. या स्पर्धा यशस्वितेसाठी श्रीकांत मांडवकर, सुधीर राजहंस, सुर्यकांत शिंदे, रत्नाकर निलंगेकर, युवराज कांबळे, प्रकाश गंगणे, पद्माकर शहाणे, यांच्यासह जनरंग अकादमी लातूरच्या पदाधिकार्‍यानी परिश्रम घेतले.


Comments

Top