• 20 of March 2018, at 12.58 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

चलबुर्गाजवळ पुन्हा अपघात ०३ ठार, ०७ जखमी

१५ दिवसात तिसरी दुर्घटना, जंपिंग रोड म्हणून हा रस्ता कुप्रसिद्ध

चलबुर्गाजवळ पुन्हा अपघात ०३ ठार, ०७ जखमी

लातूर: औसा लामजना मार्गाजवळ पुन्हा अपघात झाला असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. सातजण जखमी झाले असून त्यांना लातूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच मार्गावर दहा दिवसात घडलेली ही दुसरी दुर्घटना आहे. या घटनेतही ट्रक आणि बसचाच समावेश आहे. याही धडकेत बस फाटली आहे. रात्री सव्वाबाराच्या सुमारास चलबुर्गा पाटी ते वाघोली पाटी दरम्यान ही घटना घडल्याचे सांगितले जाते. मृतात सोनल अमित भोज निलंगा, आयशा इस्माईल बागवान हैदराबाद आणि बापुसाहेब बिडवे कळंब यांचा समावेश आहे. जखमींमध्ये अमित रामकृष्ण भोज निलंगा, मोहम्मद इस्माईल बागवान हैदराबाद, सोनू किसन काळे ढोकी, ओमप्रकाश जगन्नाथ पाटील यल्लोरी ता. औसा, सुनील सतीश शिंदे ढोकी, किशोर गोरख डोंगरे उदगीर आणि अनिस मन्सूर शेख लातूर यांचा समावेश आहे. या अपघात प्रवण क्षेत्रातील हा रस्ता-ठिकाण जंपिंग रोड म्हणून कुप्रसिद्ध आहे. घटनास्थळी किल्लारीचे पोलिस तातडीने पोहोचले. लातूर ते निलंगा या रस्त्यावर हा तिसरा मोठा अपघात आहे़. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी एस़टी़-ट्रकच्या अपघातात ०७ जण जागीच ठार झाले होते़. तर २६ नोव्हेंबर रोजी याच परिसरात झालेल्या कार अपघातात तिघे ठार झाले होते़.


Comments

Top