logo
news image आज जागतिक पुस्तक दिन, आपलं एक तरी पुस्तक लिहावं, वाचनाची गोडी लावावी news image लोकसभेसाठी तिसर्‍या टप्प्यात आज ११७ मतदारसंघात मतदान news image महाराष्ट्रात १४ ठिकाणी मतदान, अजित पवारांनी मातोश्रींसह केलं मतदान news image मतदान कार्ड अतिरेक्यांच्या आयईडी पेक्षा शक्तीशाली- मोदी news image आईचं दर्शन घेऊन नरेंद्र मोदींनी केलं अहमदाबादेत मतदान, अमित शाहही होते news image जालन्यात अनेक मतदान केंद्रात इव्हीएम मशीनमध्ये बिघाड news image उदयनराजे यांनी औक्षण घेऊन केलं मतदान news image साध्वी प्रज्ञासिंहांचे पंतप्रधानांनी केलेले समर्थन चिंताजनक- शरद पवार news image श्रीलंकेत सापडले आणखी ८७ बॉंब, तौहिद संघटनेवर शंका news image चौकीदार चोर है, राहूल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयात माफी news image अण्वस्त्रे दिवाळीसाठी नाहीत, पंतप्रधानांच्या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक news image विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी देणार नव्या चेहर्‍यांना संधी

HOME   लातूर न्यूज

ज्येष्ठ शिवसैनिकांचा युवा सेनेतर्फे सत्कार

शिवसैनिक सोशल मिडीयावर नाही, प्रत्यक्ष काम करणारे हवेत!

ज्येष्ठ शिवसैनिकांचा युवा सेनेतर्फे सत्कार

लातूर: जिल्हा युवा सेनेच्यावतीने लातूरात ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा तसेच शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा घेण्यात आला. अत्यंत कठीण परिस्थितीत जेष्ट शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही असे प्रतिपादन यावेळी माजी आमदार दिनकर माने यांनी व्यक्त केले.
येथील भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास युवासेनेचे सहसचिव प्रा. सुरज दामरे, अ‍ॅड. बळवंत जाधव, अभय साळुंके, सुनिता चाळक, जिल्हा युवा अधिकारी अ‍ॅड. श्रीनिवास उर्फ राहूल मातोळकर, कुलदीप सुर्यवंशी यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार दिनकर माने यांनी सांगीतले की, सर्व सत्तास्थाने प्रस्थापितांच्या हातात असताना, कठीण परिस्थितीमध्ये शिवसेनेची धुरा सांभाळणार्‍या ज्येष्ठ शिवसैनिकांचे योगदान कुणालाही विसरता येणार नाही.
शिवसेना नसती तर मी कधीच आमदार झालो नसतो. काँग्रेसमध्ये सतरंजी उचलण्याचेच काम करावे लागले असते. सर्व सामान्य माणसाला लोकप्रतिनिधी बनवण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले आहे. काम करणार्‍या माणसाला शिवसेनेत १०० टक्के न्याय मिळतोच. हिंदूत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. शिवसेनाप्रमुखांचा खरा वारसा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जोपासला आहे. त्यामुळेच पहले राम मंदिर फिर सरकार अशी घोषणा त्यांनी दिली. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना ठाम आहे. शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नाही. पदावर काम करणार्‍यांनी स्वतः आत्मपरिक्षण करावे, वॉटसअप, फेसबुकवरच काम करणारे नकोत तर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे शिवसैनिक हवे आहेत. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये का अपयश आले याचे आत्मचिंतन करुन नव्याने पक्ष उभारणीचे काम करा असेही यावेळी दिनकर माने यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. श्रीनिवास मातोळकर यांनी केले. यावेळी अभय साळुंके, अ‍ॅड. बळवंत जाधव, सुनिता चाळक, गोपाळ माने यांनी मनोगत व्यक्त केले.


Comments

Top