logo

HOME   लातूर न्यूज

मॅरेथॉन स्पर्धेत अमित वाघे, कोमल वैद्य प्रथम

पूरणमल लाहोटी यांच्या स्मरणार्थ राजस्थान संस्थेचे आयोजन

मॅरेथॉन स्पर्धेत अमित वाघे, कोमल वैद्य प्रथम

लातूर: मारवाडी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक अध्यक्ष पूरणमल लाहोटी यांच्या स्मृतिदिनानिमित्त्त आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रन फॉर फिटनेस’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ५५० जण सहभागी झाले होते. प्रफ़िद्ध भूलतज्ञ डॉ. आरती झंवर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. या निमित्ताने संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी आकाशात रंगीबेरंगी बलून्स सोडले. राजस्थान शाळेपासून स्पर्धेची सुरुवात झाली. मिनी मार्केट, गांधी चौक, आंबेडकर पार्क, शिवाजी चौक ते परत राजस्थान शाळा असा मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग होता. मुलांमध्ये अमित वाघे प्रथम, प्रशांतारेकर द्वीतीय, शुभम बागल तृतीय आले. मुलींमध्ये कोमल वैद्य प्रथम, वैष्णवी उबाळे द्वीतीय तर किरण पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना नुक्रमे ३१००, २१००, ११०० अशी रोख प्रारितोषिके व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पाच प्रोत्साहनपर पारितोषिके वितरीत करण्यात आली.
या कार्यक्रमास राजेंद्र मालपाणी, सह उपाध्यक्ष दिनेश इन्नानी, सचिव आशिष बाजपाई, कोषाध्यक्ष इश्वरसाद डागा, संचालक सूर्यप्रकाश धूत, शांतीलाल कुचेरिया, संजय बियाणी, हुकूमचंद कलंत्री, शामसुंदर खटोड, सुहास शेट्टी, आशिष अग्रवाल, आनंद लाहोटी, वंदना इन्नानी, रचना लाहोटी, निकिता भार्गव, पालक, शिक्षक आणि शिक्शःअकेतर कर्मचारी उपस्थित होते.
छाया: शाम भट्टड


Comments

Top