logo

HOME   लातूर न्यूज

काँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान

संघटन वाढले पाहिजे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे आवाहन

काँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान

लातूर प्रतिनिधी : लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या विविध पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपञ माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वितरीत आले. यावेळी त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील संघटलात्मक कार्यास शुभेच्छा दिल्या.
शनिवार ३० मार्च रोजी आशियाना निवासस्थानी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादल समन्वयक ॲड. विकास सुळ, लातूर शहर महिला काँग्रेस सेवादल अध्यक्ष पदी लताताई मद्दे, यंग ब्रिगेड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी बंडू सोळंकर, पूर्व ब्लॉक अध्यक्षपदी माजी नगरसेवक जी.ए.गायकवाड, पश्चिम ब्लॉक अध्यक्षपदी वैभव काकनाटे, उत्तर ब्लॉक अध्यक्षपदी आदिल शेख, दक्षिण ब्लॉक अध्यक्षपदी गोविंद शिंदे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार ञ्यंबक नाना भिसे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप, अभिजीत देशमुख, लक्ष्मणराव मोरे, श्रीशैल्य उटगे, प्रा.एम.पी.देशमुख, ॲड.बाबासाहेब गायकवाड, मनोज चिखले, अजय पाटील, मनोज देशमुख, ज्ञानेश्वर भिसे, प्रविण गौंड आदी मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाने देशाची स्वातंत्र चळवळ लढवली. देश स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर देशाच्या चौफेर विकासात काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि नेतृत्वाचे मोठे योगदान आहे. हा काँग्रेसचा वैचारीक वारसा आहे. हा वारसा जतन करून वाढविण्यासाठी सेवादलाची संघटनात्मक बाजू महत्वाची राहणार आहे. या करीता सेवादलाचे संघटन आणि कार्य लातूरमध्ये वाढविण्याची गरज असल्याचे यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले.


Comments

Top