logo

HOME   लातूर न्यूज

मच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद

दर्ग्यात चादर अर्पण, थोर नेत्यांना अभिवादन, उदगीर भागात गावे पिंजली

मच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद

लातूर: लातूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांनी ग्रामदैवत, महापुरूषाचे पुतळयांचे दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात केली. प्रचारांच्या निमीत्ताने ग्रामबैठक, मतदारांची प्रत्यक्ष भेट, व्यापारी उदयोजक, व्यवसायीक, वकील यांच्या संवाद साधला. तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भेट घेवुन काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.
उमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांनी गुरुवार, दिनांक ४ एप्रिल रोजी उदगीर येथील उदागीर बाबाचे दर्शन घेतले, खाजाबाशा सद्रोदिन दर्गा येथे चांदर अर्पण केली, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळयास अभिवादन केले. यानंतर लोणी, तोंडार, गुडसुर येथील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. डोंगरशेळकी येथील  समर्थ सद्गुरु धोंडूतात्या महाराज देवस्थानाचे दर्शन घेऊन वाढवणा बु येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले हाळी-हंडरगुळी, हेर येथे जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत संवाद साधला. उदगीर येथे वकील संघास भेट देऊन संघाच्या पदाधिकारी, सदस्य, विधिज्ञाशी काँग्रेस पक्षाकडून काय अपेक्षा आहेत त्याबाबतीत  संवाद साधला व उदगीर येथील व्यापारी असोसिएशनची भेट घेऊन असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा केली. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास आपण प्राधान्य देवू असे सांगीतले. नळगीर, नागलगाव, देवर्जन येथील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन काँग्रेस पक्षाला विक्रमी मताने निवडून द्यावे काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर सामान्य माणसाचे प्रश्न सुटतील यामुळे मला मतदान देवून विजयी करावे आणि देशात काँग्रेस पक्षाचे सरकार आणावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. काँग्रेस महाआघाडीतील  पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने या प्रचारादरम्यान उपस्थित होते.


Comments

Top