logo
news image पावसात व्यत्यय येण्याची शक्यता, अल निनो वादळाचे सावट news image गोकुळ दूध संघाच्या अंदोलनाला खा. राजू शेट्टी यांचा एक दिवसाचा पाठिंबा news image दुधाला लिटरमागे पाच रुपायांची वाढ द्या- राजू शेट्टी news image मुंबईच्या समुद्राला आज सर्व लाटांचं तांडव सुरु, पालघरध्ये अनेक घरात समुद्राचे पाणी! news image आषाढी एकादशीच्या वारीसाठी पोलिसांनी तयार केले खास अ‍ॅप, अ‍ॅपमध्ये सगळ्य़ा सुविधा news image मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे पालघरात तिघे जखमी

HOME   लातूर न्यूज

दिव्यांग बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण

पर्यावरणाच्या समतोलासाठी पर्यावरणपूर्क वृक्षांची लागवड

दिव्यांग बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण

लातूर: वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग दिनाचे औचित्य साधून धडधाकट माणसाला लाजवेल असे कार्य करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय पर्यावरणचा समतोल राखला जावा यासाठी दिव्यांग बांधवांच्या हस्ते लातुरातील राजे शिवाजी नगरात पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग असून देखील नृत्य आणि कला क्षेत्रात लातूरचे नाव गाजविणारा युवक योगेश शेळके, दिव्यांग बांधवांसाठी गेल्या दीड दशकापासून कार्य करीत असलेले बसवराज पैके यांचा सत्कार करण्यात आला. राजे शिवाजी नगरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रथमेश गवळी यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त गवळी कुटुंबियांनी 'वसुंधरा' ट्री बँकेस ०५ वृक्ष रोपे भेट दिली.
राजे शिवाजी नगरात पार पडलेल्या वृक्षारोपण मोहिमेत कॉक्सीट कॉलेजचे प्रा. वैजनाथ भोसले, प्रसिद्ध मूर्तीकार दिनेश लोखंडे, दीपक लोखंडे, अमित हलगरकर, अवधूत मदने, विशाल चौधरी, राणा भोसले, सौरभ चोले यांच्यासह वसुंधरा प्रतिष्ठानचे सहसचिव अमर साखरे, सदस्य गणेश कुंभार, वृक्षारोपण अभियान प्रमुख श्रीकांत क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष नागेश जाधव, बालाजी केदार, शहर उपाध्यक्ष रामदास घार, वैभव गडकरी आदी सहभागी झाले होते.


Comments

Top