logo

HOME   लातूर न्यूज

देश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा

दिलीपरावांचा हल्लाबोल, कामंत आणि राणा पाटलांना विजयी करण्याचे आवाहन

देश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा

लातूर: देशात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या लोकांना देश चालवण्याचा नुभव नाही. खोटी आश्वासने देत राहतात. मोदी सरकारला आता बाय बाय करावे लागेल. त्यांना घरची वाट दाखवा असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. ते मुरुड येथील जाहीर सभेत बोलत होते. लातुरचे कॉंग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत आणि उस्मानाबादचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन दिलीपरावांनी केले. मोदींनी प्रसार माध्यमे, आपल्याच पक्षाचे खासदार, आणि नेत्यांची मुस्कटदाबी केली असा आरोप आमदार हरीभाऊ राठोड यांनी केला. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सत्तार पटेल, उदय गवारे, सर्जेराव मोरे, धनंजय देशमुख, अरुण कुलकर्णी, आबासाहेब पाटील, लक्ष्मण मोरे, विजय देशमुख, अभय नाडे, राजेंद्र मस्के, भारत लाड, विक्रम हिप्परकर, शाहूराज पवार, सुनिता आरळीकर, संभाजी वायाळ, जगदीश बावणे, चांदपाशा इनामदार, सतीश पाटील, इश्वर चांडक, दीपक पटाडे, उद्धव सवासे, उद्धव तवले उपस्थित होते.


Comments

Top