HOME   लातूर न्यूज

मतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा

जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची कळकळीची विनंती!


मतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा

लातूर: भारत निवडणुक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ साठी मतदारांना मतदान करताना मतदार ओळखपत्राशिवाय इतर ११ पुरावे ग्राह्य मानले आहेत. लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी ११ पुराव्यापैकी किमन एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवून आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे. 41- लातूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघासाठी दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत असून या दिवशी जे मतदार मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करु शकणार नाहीत त्यांनी ११ छायाचित्रासह असलेले ओळखपत्र सादर करुन आपली ओळख निश्चित करावी. व मतदान करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. यात पासपोर्ट, वाहन चालक परवाना, केंद्र-राज्य सरकार- सार्वजनिक उपक्रम-पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, बँक-पोस्ट ऑफीसद्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबूक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर ) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय ) व्दारा जारी केलेले स्मार्ट कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटोसह पेंशन दस्तऐवज, खासदार-आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, आणि आधार कार्ड.


Comments

Top