HOME   लातूर न्यूज

मी मतदान करणारंच!

बुथ चले हम, मतदाताओंके साथ चले हम!


मी मतदान करणारंच!

लातूर: मतदारांनो कोणत्या पक्षाला धडा शिकवायचाय त्याला शिकवा. पण सरकार काय आवाहन करतंय ते वाचा!
भारत निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर केला. जगातील सर्वात मोठया लोकशाहीचा महाउत्सवासाचा प्रारंभ झाला. भारतीय जनतेने २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेचा स्विकार करुन प्रजासत्ताक गणतंत्र पध्दतीचा अवलंब केला. सध्या निवडणूक आयोगाने १७ व्या लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम सात टप्यात जाहीर केला. संपूर्ण भारत देशात एकूण सात टप्यात लोकशाहीचा महाउत्सव साजरा केला जाणार आहे. त्याच अनुषंगाने 41- लातूर लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल २०१९ रोजी दुसऱ्या टप्यात मतदान होणार आहे. सन २००९ व सन २०१४ च्या लातूर लोकसभा निवडणूकीत अनुक्रमे ५४ व ६२ टक्के मतदान झाले होते. परंतू भारत निवडणूक आयोग SVEEP (Systematic Voters Election and Election participation) या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशभरातील नागरिकांचा मतदानाच्या प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हयातील सर्व शासकीय यंत्रणेची बैठक घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येकी १० अधिकाऱ्यांचा एक गट तयार करुन विविध संकल्पना सांगण्याचे आवाहन केले. यावेळी जवळपास ८० ते ८५ विविध प्रकारच्या मतदार जागृतीबाबतच्या संकल्पना पुढे आल्या. तसेच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर लोकसभा मतदार संघात ७५ ते ८० टक्के मतदान होण्यासाठी सांघिकपणे काम करण्यास एकमत होऊन प्रत्येक विभागाने आपआपल्या स्तरावरुन मतदार जागृतीचे कार्यक्रम घेऊन त्याबाबतची माहिती स्वीपच्या नोडल अधिकारी दीपाली मोतीयाळे यांना सादर करण्याचं ठरले. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या या उपक्रमाला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी “मिशन डिस्टींक्शन ” असे संबोधून या अंतर्गत कार्यक्रम राबविण्याचे निश्चित झाले. तसे पाहता प्रशासनाकडून १०० टक्के मतदान होण्यासाठीच प्रयत्न केले जात आहेत.


Comments

Top