• 20 of March 2018, at 1.07 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

स्पर्धा परिक्षा: आज मोफत मार्गदर्शन

विद्यार्थ्यांच्या समस्यांचे करणार निवारण

स्पर्धा परिक्षा: आज मोफत मार्गदर्शन

लातूर: जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी ०५ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ०५ वाजता दयानंद महाविद्यालय संस्थेच्या सभागृहात मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले आहे. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून परभणीचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (भाप्रसे), तहसिलदार आकाश लिगाडे (एमपीएससी, 2007 महाराष्ट्रात सर्व प्रथम) हे उपस्थित राहणार आहेत. तर गणित व बुध्दीमत्ता या विषयावर धनंजय गायकवाड मार्गदर्शन करतील. तसेच या शिबीरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांच्या समस्याचे निरसन करतील. अधिक माहिती हवी असल्यास विद्यार्थ्यांनी गटशिक्षणधिकारी लातूर तृप्ती अंधारे 8698503503, उपविभागीय अधिकारी औसा–रेणापूर जनार्धन विधाते 7588649030, 9049595788 व उपविभागीय अधिकारी लातूर रामेश्वर रोडगे 9822366519 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी औसा–रेणापूर यांनी केले आहे.


Comments

Top