HOME   लातूर न्यूज

जिल्हा बॅंकेच्या खातेदार शेतकर्‍यांना मिळाली ११४ कोटी ३३ लाखांची माफी

अनेक शेतकरी अजूनही प्रतिक्षेत, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे काय झाले कळेना


जिल्हा बॅंकेच्या खातेदार शेतकर्‍यांना मिळाली ११४ कोटी ३३ लाखांची माफी

लातूर (आलानेप्र): जिल्हा बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या ९० हजार ८०१ शेतकर्‍यांना ११४ कोटी ३३ लाख रुपये कर्जमाफ़ी मंजूर झाली असून, त्यापैकी ०५ हजार ८९ शेतकर्‍यांच्या खात्यावर १७ कोटी २५ लाख रुपये जमा झाले आहेत. तर ७१ हजार ४५७ शेतकर्‍यांच्या खात्यावर ९७ कोटी ८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या ३० जून २०१६ अखेर २६ हजार १०० शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे ७९ कोटीची थकबाकी असून, त्यांपैकी ५ हजार ८९ थकबाकीदार शेतकर्‍यांना १७ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्य़ात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या एकूण चालू थकबाकीदांची संख्या ०१ लाख ७४ हजार १९३ आहे. त्यांना १६० कोटी कोटींची कर्जमाफ़ी अपेक्षीत होती मात्र ११३ कोटी रुपयेच मिळाले आहेत. यातील ४७१ शेतकर्‍यांची पडताळणी बाकी आहे. राष्ट्रीयकृत व अन्य बॅंकांचे थकबाकीदार शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे की नाही याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान अनेक राष्ट्रीयकृत बॅंकाचे थकबाकीदार शेतकरी बॅंकाची दारे ठोठावत आहेत. मात्र त्या बॅंकाकडून प्रतिसाद मिळालेला नाही असे शेतकरी सांगतात.


Comments

Top