• 20 of March 2018, at 1.00 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

कॉंग्रेस मिडिया सेलची राज्यस्तरीय परिषद लातुरात- कुलकर्णी

कॉंग्रेस मिडिया सेलची राज्यस्तरीय परिषद लातुरात- कुलकर्णी

प्रदेश कॉंग्रेस मिडिया सेल प्रतिनिधींची आगामी राज्यस्तरीय परिषद लातूर येथे घेण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सोशल मिडियाचे नूतन अध्यक्ष अभिजीत सपकाळ यांनी मान्यता दिली आहे. ही माहिती लातूर जिल्हा कॉंग्रेस मिडिया सेलचे समन्वयक हरीराम कुलकर्णी यांनी दिली. प्रदेश कॉंग्रेस मिडिया सेलची बैठक नुकतीच टिळक भवन मुंबई येथे झाली. राज्यभरातील जिल्हा कॉंग्रेस मिडिया सेलचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत लातूर जिल्हा कॉंग्रेस मिडिया सेलचे समन्वयक हरीराम कुलकर्णी यांनी लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी राज्यस्तरीय परिषद लातूर येथे घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. सरकारच्या कामाबद्दल जनतेच्या मनातील आक्रोश सरकारपर्यंत पोचवणाचे काम कॉंग्रेसने केला. यात सोशल मिडियाचा मोठा वाटा आहे असे अभिजीत सपकाळ यांनी सांगितले. या बैठकीला प्रदेश कॉंग्रेस मिडिया सेलचे समन्वयक विनय खामकर, डॉ. धनंजय क्षिरसागर, सुधीर पवार, प्रदेश कॉंग्रेस मिडिया सेलचे समन्वयक चित्रा बाथम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्यातील प्रदेश कॉंग्रेस मिडिया सेलचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.


Comments

Top