HOME   लातूर न्यूज

वीज बील भरणा केंद्राचे आंदोल्न, दोन दिवस जिल्ह्यात बंद


वीज बील भरणा केंद्राचे आंदोल्न, दोन दिवस जिल्ह्यात बंद

महावितरणच्या कर्मचार्‍यांनी खाजगी पण अधिकृत वीज बील भरणा केंद्रांवर अरेरावी आणि शिवीगाळ गेल्याने अनेक केंद्रे बंद झाली आहेत. त्यातच वाढीव सुरक्षा ठेव मागितली जात असल्याने शनिवार आणि सोमवारी जिल्हाभरातील केंद्रे बंद ठेवली जाणार आहेत. आज या केंद्रांच्या संचालकांनी लातुरचे मुख्य अभियंता राजाराम बुरुड घेऊन आपली तक्रार नोंदवली आणि निवेदनही दिले. या केंद्रांना आता वाढीव सुरक्षा ठेव मागितली जात आहे. आधीच्या ठेवींवरील व्याज दोन वर्षांपासून मिळाले नाही. केंद्रातली पावती पुस्तके आणि दस्तावेज कसलीही सूचना न देता महावितरणचे कर्मचारी शिवीगाळ करीत ताब्यात घेतात. मागच्या सात वर्षात फक्त ५० पैसे पावतीवाढ मिळाली. तीही आयकरात जाते. याच काळात युनिटचे दर आठ ते दहावेळा वाढवले गेले. कर्मचार्‍यांना सहावा आणि सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ दिली गेली पण महावितरणला उत्पन्न मिळवून देणार्‍या या वीज बील केंद्रांकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जाते असे निवेदनात नमूद करण्यात आले असून वाढीव डिपॉझिट पाहिजे असल्यास या केंद्रांची थकित बिले, डिपॉझिटवरील व्याज, डिपॉझिटची रक्कम परत करावी, ही केंद्रे बंद करण्याची लेखी सूचना द्यावी, यावर विचार न झाल्यास नाईलाजाने वीज बील भरणा केंद्रे बंद ठेवावी लागतील असा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती अशी माहिती समता नगरी पतसंस्थेच्या वीज बील भरणा केंद्राचे संचालक अशोक गोविंदपूरकर यांनी दिली.


Comments

Top