HOME   लातूर न्यूज

शिवजयंतीला मुलीला जन्म देणाऱ्या मातेला साडीचा आहेर

वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे लेक वाचवा संदेश देणारा उपक्रम


शिवजयंतीला मुलीला जन्म देणाऱ्या मातेला साडीचा आहेर

लातूर: शिवरायांची जयंती 'वसुंधरा प्रतिष्ठान'च्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. लेक वाचवा हा संदेश देण्यासाठी शिवजयंती दिवशी मुलीला जन्म देणाऱ्या मातेस साडीचा आहेर करण्यात आला. हा उपक्रम लातूर येथील शासकीय रुग्णालयात राबवण्यात आला.
स्त्री भ्रूण हत्या हा ज्वलंत विषय आहे. समाजात मुलीची संख्या कमी होणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे मुलगी वाचवा... देश वाचवा हा संदेश वसुंधरा प्रतिष्ठानने या उपक्रमातून दिला. यावेळी मुलगी जन्माला आली याचे समाधान त्या मातांच्या चेहऱ्यावर झळकत होते. लातुरातील सरकारी दवाखान्यात हा उपक्रम साजरा झाला. खरोखरच हा उपक्रम करताना मनातून आनंद झाला. कदाचित आमचे कुठले तरी भाग्य असेल, अशा पद्धतीने जयंती साजरी करण्याची सद्बुद्धी आम्हास मिळाली. वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक सहसचिव अमर साखरे यांच्या पुढाकाराने हा अनोखा उपक्रम साजरा करीत आम्ही शिवरायांची जयंती साजरी केली. असे सांगण्यात आले. याप्रसंगी वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रा.योगेश शर्मा, उमाकांत क्षीरसागर, अजय साठे, श्रीकांत क्षीरसागर, उमाकांत मुंडलीक, अविनाश राठोड यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी, तेथील सुरक्षा पोलीस उपस्थित होते. हा उपक्रम राबविण्यासाठी सरकारी दवाखान्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी परवानगी दिली.


Comments

Top