• 20 of March 2018, at 1.18 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

‘मांजरा’ने केले पाच लाख टन ऊसाचे गाळप

‘मांजरा’ने केले पाच लाख टन ऊसाचे गाळप

लातूर: विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात २१ फेब्रुवारी १०८ व्या दिवसाखेर पाच लाख ५६० टन ऊसाचे गाळप केले. एकूण ०५ लाख ५५ हजार ६५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ११.२७ टक्के इतका उतारा नोंदवला गेला. कारखान्याने ०२ कोटी ८० लाख ७१ हजार युनिट्स वीज महावितरणला दिली. ३९,६९,८६२ लिटर मद्यार्क व १६,८३,९८९ लिटर इथेनॉल तयार झाले आहे. साखर कारखाना संपूर्ण क्षमतेने चालत आहे.


Comments

Top