HOME   लातूर न्यूज

केवळ सत्ता बदलल्याने परिस्थिती बदलत नसते

लाल बावटा उखडून टाकण्याची भाषा, समाजवादाला शत्रू मानतात- बाबा आढाव


केवळ सत्ता बदलल्याने परिस्थिती बदलत नसते

लातूर:केव्ळ सत्ता बदलून परिस्थिते बदलत नसते, आज सत्ता चालवणारे समाजवादाला शत्रू मानतात, लाल बावटा उखडून टाकण्याची भाषा करतात. यामुळे तरुण पिढीचे प्रश्न जटील होत चालले आहेत, देश चुकीच्या वळणावर जात आहे. मुलभूत बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, लातूरच्या सामाजिक चळवळीचे नेते अ‍ॅड. मनोहरराव गोमारे यांनी लिहिलेल्या ‘सत्वपरीक्षा’ या आत्मकथनाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते. शाम मंगल कार्यालयात शनिवारी हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी डॉ. जनर्दन वाघमारे, ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुरु, आ. अमित देशमुख, राणा जगजितसिंह पाटील, आ. विक्रम काळे,सौ. कुसुमताई गोमारे, रेखा रेड्डी उपस्थित होते. समाजवादी मूल्ये भारतीय मातीत का रुजत नाही असा प्रश्न करीत शेतकर्‍यांची चळवळ फसत आहे, वर्ण व्यवस्था बळ धरु लागली आहे, आर्य समाजाचा विचार मागे पडत चालला आहे. बेकारी वाढत चालली आहे. गरीब गरीबच होत आहे. देशाची ७१ टक्के संपत्ती ०१ टक्क लोकांच्या ताब्यात आहे. पण गोमारे यांनी समाजवादी विचार कधीच सोडला नाही असे बाबांनी सांगितले.
स्वत:साठी जगत असताना समाजासाठी सामाजिक बांधीलकीने जगले पाहिजे असे अ‍ॅड. मनोहरराव गोमारे म्हणाले. भाई वैद्य यांच्या शुभेच्छापर पत्राचे वाचन अ‍ॅड. शोभा दुड्डे यांनी केले.


Comments

Top