logo
news image पाच राज्यात कॉंग्रेस आघाडीवर news image मोदी सरकारच्या विरोधात एकवटले २१ विरोधी पक्ष news image विजय माल्ल्याला पाठवा परत भारतात, लंडन कोर्टाचा आदेश news image लातुरच्या न्यायालयाच्या परिसरात थुंकणार्‍यावर लगेच खटले, ८० सीसीटीव्ही कॅमेरे news image कर्नाटकात लिंगायतांना अल्पसंख्याचा दर्जा देण्यास न्यायालयाचा नकार news image आरक्षणासाठी लातूरचा लिंगायत समाज पुन्हा भेटणार मुख्यमंत्र्यांना news image लोदगा येथे होणार हवामान बदलांचा अभ्यास news image भाजपाच्या जाहीरनाम्याचे धनगर कर्यकर्त्यांनी केले उदगीरमध्ये दहन news image दुकानफोडी प्रकरणी लातुरात दोघांना अटक, दोन दुचाकी जप्त news image मुंबई-बीदर धावत्या रेल्वेत महिलेने दिला बाळाला जन्म, लातुरच्या अधिसेविकेने केली मदत news image लातूर परिसरातील ६० खडी केंद्रांची करणार ड्रोनद्वारे मोजणी news image लातूर शहरातील तीन आधार केंद्रे सुरु, बाकी बंद news image पंचायत समिती, तहसील, मनपा, बॅंका आणि जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार बाकी केंद्रं news image मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम, तेलंगणा, राजस्थानात आस्तित्व टिकवण्याचे कॉंग्रेसला आव्हान news image संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात news image यमुनेत नाव बुडाल्याने मराठवाड्यातील तिघांचा मृत्यू

HOME   लातूर न्यूज

नवे आयुक्त दिवेगावकरांना ‘पटवण्याचे’ भाजप, कॉंग्रेसकडून प्रयत्न

दिवेगावकर फुफाट्यात पडतील का? की लगेच दुसरीकडे बदलून जाण्याचा प्रयत्न करतील?

नवे आयुक्त दिवेगावकरांना ‘पटवण्याचे’ भाजप, कॉंग्रेसकडून प्रयत्न

रवींद्र जगताप, लातूर: मनपाचे आयुक्त हंगे ऐकत नाहीत, फक्त कॉंग्रेसच्या लोकांना साथ देतात. महापौरांसह सगळ्याच नगरसेवकांची ही तक्रार कामी आली आणि त्यांची बदली झाली. आता कॉंग्रेसवाले काळजीत पडले आहेत. नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर आपल्याला साथ देतील का, भाजपवाले अडवणूक करतील तेव्हा न्याय देतील का? मनपात कॉंग्रेसने केलेल्या कामावरच पुढच्या निवडणुकीचं आणि विधानसभेचंही भवितव्य अवलंबून आहे. कॉंग्रेस गोटात चाचपणी केली सगळीकडे सूतक आहे. कौस्तुभ दिवेगावकर लातुरचेच असल्याने त्यांना ‘पटवण्याचा’ प्रयत्न दोन्हीकडून आताच सुरु झाला आहे. गुप्त माहितीनुसार कौस्तुभ दिवेगावकर यांना लातुरच्या मनपाची स्थिती कळाली आहे. या फुफाट्यात पडण्यापासून कसं वाचायचं यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे!
चार महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तपदाचा अच्युत हंगे यांनी पदभार स्वीकारला होता, मात्र सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांसोबत त्यांचे जमले नाही. परिणामी त्यांची लातूर येथून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी लातूरचे भूमीपुत्र असलेल्या कौस्तुभ दिवेगावकर यांची आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. विशेष म्हणजे दिवेगावकरांची मंगळवारी दुपारी पुणे येथे बदली झाली होती. ती तातडीने रद्द करून सांयकाळी लातूरचे आयुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. अच्युत हंगे यांना अद्यापही नियुक्ती देण्यात आली नाही. मंगळवारी पालकमंत्री निलंगेकर यांनी मंत्रालयात महापौर सुरेश पवार, उप महापौर देविदास काळे, सभागृह नेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांची बैठक घेतली. यात हंगे यांच्याबद्दल तक्रारी करण्यात आल्या. याच दिवशी दुपारी राज्यातील काही आयएएस अधिकार्‍यांच्या शासनाने बदल्या केल्या होत्या. यात कौस्तुभ दिवेगावकर यांची पुणे येथे महापलिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. सांयकाळी मात्र दिवेगावकरांची लातूरचे महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. दिवेगावकर यांच्या रुपाने लातूर महापलिकेला पहिल्यांदाच भूमीपुत्र प्रमुख अधिकारी मिळाला आहे.


Comments

Top