logo
news image पावसात व्यत्यय येण्याची शक्यता, अल निनो वादळाचे सावट news image गोकुळ दूध संघाच्या अंदोलनाला खा. राजू शेट्टी यांचा एक दिवसाचा पाठिंबा news image दुधाला लिटरमागे पाच रुपायांची वाढ द्या- राजू शेट्टी news image मुंबईच्या समुद्राला आज सर्व लाटांचं तांडव सुरु, पालघरध्ये अनेक घरात समुद्राचे पाणी! news image आषाढी एकादशीच्या वारीसाठी पोलिसांनी तयार केले खास अ‍ॅप, अ‍ॅपमध्ये सगळ्य़ा सुविधा news image मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे पालघरात तिघे जखमी

HOME   लातूर न्यूज

धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त १६४ रुग्णांची तपासणी

धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त १६४ रुग्णांची तपासणी

लातूर: लातूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा जि.प. सदस्य धीरज देशमख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिरशी ता. लातूर येथे आधार फांउडेशन, धनेगाव ता. लातूर, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान ता. लातूर, कै. बब्रूवान विठ्ठलराव काळे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, लातूर व प्राथमिक आरोग्य केंद्र बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत मोफत सर्वरोग निदान व उपचार ‍शिबीराचे आयोजन सिरशी ता. लातूर, येथे करण्यात आले होते. या शिबिरात १६४ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती शिबिराचे आयोजक आधार फांउडेशनचे अध्यक्ष तथा रेणा साखरचे संचालक प्रविण हणमंतराव पाटील यांनी दिली आहे. युवा नेते धिरजभैय्या विलासरावजी देशमख यांच्या वाढदिवसानिमित आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे उदघाटन माजी जि.प. अध्यक्ष संतोष देशमुख व लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष दगडुसाहेब पडिले यांनी केले. तर प्रमुख्‍ पाहुणे म्हणून विलास कारखान्याचे संचालक युवराज जाधव, पं.स.चे माजी उपसभापती अरुण चामले व पं.स.चे माजी सदस्य बादल शेख यांची उपस्थिती होती.
सर्वरोग निदान व उपचार शिबीरामध्ये संधिवात, आमवात, पोटाचे विकार, मधुमेह, रक्तदाब, त्वचा विकार, गुप्तरोग इत्यादि आजारावर मोफत उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे लिव्हर फंक्शन टेस्ट, थॉयराईड, कोलेस्टेराट्रॉल, कॅलशिय, किडनी फंक्शन टेस्ट इत्यादी आजारांच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या त्यांचे चाचणी रिपोर्ट्स बुधवारी सिरशी येथे आधार फाऊंडेशनच्या वतीने विश्लेषणासह देण्यात येणार आहेत. या शिबिरात कै. बब्रूवान विठ्ठलराव काळे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ.नरेश कोरे, डॉ.अनंत पवार, डॉ. अरुणा रुपनर, डॉ.पल्लवी खंदारे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बोरी येथील टेक्निशिअन पी.पी.परळीकर, तुकाराम पुरी, मोनिका कदम, सी.आर.पांचाळ, डी.आर.शेट्टे आदींनी तपासणी केली.


Comments

Top