logo
news image पावसात व्यत्यय येण्याची शक्यता, अल निनो वादळाचे सावट news image गोकुळ दूध संघाच्या अंदोलनाला खा. राजू शेट्टी यांचा एक दिवसाचा पाठिंबा news image दुधाला लिटरमागे पाच रुपायांची वाढ द्या- राजू शेट्टी news image मुंबईच्या समुद्राला आज सर्व लाटांचं तांडव सुरु, पालघरध्ये अनेक घरात समुद्राचे पाणी! news image आषाढी एकादशीच्या वारीसाठी पोलिसांनी तयार केले खास अ‍ॅप, अ‍ॅपमध्ये सगळ्य़ा सुविधा news image मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे पालघरात तिघे जखमी

HOME   लातूर न्यूज

मॉर्निंग वॉक करणार्‍या दोघांना उडवलं, एक ठार एक गंभीर

लातुरच्या तहसीलजवळचा सकाळचा प्रकार, धडकणारे वाहन अज्ञात, कारवाई सुरु

मॉर्निंग वॉक करणार्‍या दोघांना उडवलं, एक ठार एक गंभीर

लातूर: आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकजण जागीच दगावला तर दुसर्‍यावर विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बन्सीलाल भराडिया (गीता इलेक्ट्रीकल्स) आणि हरिप्रसाद भराडिया (विवेक बुक स्टॉल) हे दोघेजण नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला होते. परतताना लातूर तहसील कार्यालयाजवळ या दोघांनाही अज्ञात वाहनाने उडवले, ते वाहन तसेच भरधाव निघून गेले. या अपघातात बन्सीलाल भराडिया जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेल्या हरिप्रसाद भराडिया यांच्यावर विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला. बन्सीलाल भराडिया यांचे शव विच्छेदनही झाले. संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या नावंदर गल्ली येथील निवासस्थानातून अंतयात्रा निघेल. मारवाडी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.


Comments

Top