HOME   लातूर न्यूज

लोकराज्यचा डॉ. आंबेडकर यांच्यावरील विशेषांक संग्राह्य

जिल्हा माहिती कार्यालयाने केले हा अंक खरेदी करण्याचे नागरिकांना आवाहन


लोकराज्यचा डॉ. आंबेडकर यांच्यावरील विशेषांक संग्राह्य

लातूर: राज्य शासनाचे मुख्यपत्र असलेल्या लोकराज्यचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढलेला महामानवाला अभिवादन हा विशेषांक अत्यंत वाचनीय व संदर्भमूल्य म्हणून संग्रही ठेवावा असा वैचारिक ठेवा असलेला अंक आहे. हा अंक समाजातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत, असे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी सांगितले. तसेच लोकराज्यच्या अंकाची मांडणी व छपाई उत्कृष्ट झाली असून मजकूर ही दर्जेदार आहे, अशा शब्दात लोकराज्य अंकाचे कौतूक केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या एप्रिल २०१८ च्या ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे प्रकाशन लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते विभागीय माहिती कार्यालयात झाले. यावेळी लातूर विभागाचे उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, आर.पी.आय (आठवले गट) चे अशोक कांबळे, हरिभाऊ गायकवाड, पत्रकार अनिल पौळकर, बालाजी पाटील चाकुरकर, डी. एम. शेळके, सिध्दार्थ कवठेकर, पत्रकार विनोद कांबळे, संजय स्वामी, दयानंद कांबळे, बाबुराव बोडके आदी उपस्थित होते.
या विशेषांकातील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची पत्रकार मधू कांबळे यांनी घेतलेली मुलाखत, राजषी शाहू आणि डॉ. आंबेडकर (डॉ. जयसिंगराव पवार ), परिवर्तनाचे अग्रदूत (डॉ. शैलेंद्र लेंडे ), जलनीतीचे उद्गाते (अविनाश आ. चौगुले ), ऊर्जाशक्तीला चालना (डॉ. जी. एस. कांबळे), उत्कृष्ट संसदपटू आणि शिस्तप्रिय प्रशासक (डॉ. संभाजी खराट ), बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरु केली? महामानवाचा स्मृतिगंध ( मिलिंद मानकर ), ग्रंथकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. संदेश वाघ ), बुद्विवादीची प्रेरक शक्ती (प्रा. डॉ. म. सु. पगारे), शिक्षणाची मुहुर्तमेढ (दत्ता गायकवाड ), शांततामय सहजीवनाचे हमीपत्र (डॉ. अक्रम ह.पठाण ), महामानवाचा जीवनपट, समतेचा उद्गाता (प्रा. नागसेन भीमरावजी ताकसांडे ), प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती देणारी तीर्थस्थळे (डॉ. बबन जोगदंड ), सुरक्षेचा प्रहरी (डॉ. विजय खरे ), ज्येष्ठ विचारवंत डॉ.गंगाधर पानतावणे यांच्यावरील दलित साहित्याचा आधारवड (यशवंत भंडारे ), आदी लेख वाचनीय आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सदरचा अंक खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय लातूर मार्फत करण्यात आले आहे.


Comments

Top