logo
news image आज शिवजयंती, लातुरात विविध कार्यक्रम आयोजित, रॅली, मिरवणुका, रक्तदान.... news image तुळजापूर घाटात अपघात, नऊजण ठार, सर्वजण सोलापुरचे news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन news image नाणार प्रकल्प अन्यत्र उभारणार, नागरिकांच्या संमतीचा विचार करणार- मुख्यमंत्री news image भाजपासोबतचे सगळे वाद-विवाद मिटले, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे- उद्धव ठाकरे news image इडीची भिती घातल्याने शिवसेनेने केली युती, विरोधकांचा आरोप news image शिवसेना-भाजपा राज्यातील ४५ जागा जिंकणार- अमित शाह news image महागठबंधनचं सरकार आलं तर लीडर नव्हे तर डीलर देश चालवतील - अमित शाह news image शेतकरी कर्जमाफीसाठी तातडीने आढावा घेण्यात येणार- देवेंद्र फडणवीस news image राज्यातील दुष्काळी भागात शिवसेना भाजपचे कार्यकर्ते एकत्र काम करणार- देवेंद्र फडणवीस news image शिवसेना आणि अकाली दल आमचे सर्वात जुने मित्र, या पक्षांनी आम्हाला साथ दिली- देवेंद्र फडणवीस news image कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकने मांडले चुकीचे मुद्दे news image उद्धव ठाकरे यांनी गैरसमज मिटवले- अमित शाह news image रिझर्व बॅंक केंद्राला देणार २८ हजार देणार कोटी

HOME   लातूर न्यूज

अपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री गेले धावून

खा. गायकवाड, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, तिरुके यांनीही दिली घटनास्थळाला भेट

अपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री गेले धावून

लातूर: औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाल्याची चर्चा कानी पडताच जिल्हयाचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांची मदत केली. संबंधित यंत्रणांना कामाला लावले. यामुळे गंभीर जखमींना तातडीने उपचार मिळण्यास मदत झाली. पालकमंत्री यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर हे देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. नियोजित कार्यक्रमानुसार पालकमंत्री संभाजी पाटील शनिवारी दुपारी औसा तालुक्यात होते. ०३ वाजण्याच्या सुमारास चलबुर्गा पाटीजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला. या भयंकर अपघातात अनेकजण जखमी झाल्याची तसेच मृत्यू पडल्याची वार्ता पालकमंत्र्यांच्या कानी पडली हे ऐकताच ते तेथून तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. घटनास्थळावरील चित्र पाहून पालकमंत्रीही सुन्न झाले. परंतू या प्रसंगात जखमीवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी घटनास्थळावरुनच त्यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. आरोग्य विभाग, रुग्णवाहिका, पोलिसयंत्रणा यांना सूचना करत जखमी रुग्णांना औसा आणि जवळच्या रुग्णालयात पोचवण्याची व्यवस्था करुन दिली. खुद्द पालकमंत्री जातीने घटनास्थळावर हजर असल्याने जखमींना वेळेत उपचार मिळू शकले. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकले. पालकमंत्री संभाजी पाटील घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच त्यांचे धाकटे बंधू अरविंद पाटील तेथे पोचले होते. त्यांनीही पालकमंत्री तसेच अधिकार्‍यांनाही घटनेची माहिती देऊन मदत कार्याला वेग दिला. पालकमंत्र्यांसोबत खा. डॉ. सुनिल गायकवाड, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, कृषी सभापती बजरंग जाधव, अप्पर पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे, निलंग्याचे उपविभागीय अधिकारी गोपाळ रांजणकर, औशाचे पोलिस उपअधिक्षक गणेश किंद्रे, निलंग्याचे पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर, सुनील उटगे, प्रविण कस्तुरे यांनीही घटनास्थळी अपघताग्रस्तांची मदत केली.


Comments

Top