logo
news image लातुरच्या त्रिपुरा महाविद्यालयातील ११ वीच्या विद्यार्थीनीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न news image त्रिपुराची विद्यार्थिनी गंभीर जखमी, सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु news image कोरम अभावी लातूर मनपाच्या स्थायी समितीची बैठक रद्द news image लातूर मनपाची स्थायी समितीची बैठक कोरमअभावी तहकूब, भाजपचे चार सदस्य आलेच नाहीत पण कॉंग्रेसच्या सर्व सदस्यांचा बहिष्कार news image पुण्यात उद्यापासून चितळेंचं दूध मिळणार नाही news image पुण्यात महादेव जानकारांच्या नावाची पाटी गाढवाच्या गळ्यात घालून मिरवणूक, गाढवाला दुग्धाभिषेकही घातला news image आज लातूर मनपाची स्थायी समितीची बैठक, उद्या सर्वसाधारभ सभा news image करण भताने या २० वर्षांच्या तरुणाचा लातुरच्या क्रीडा संकुलावर धावण्याचा सराव करताना हृदयविकाराने जागीच मृत्यू news image करण चाकूर तालुक्यातला, त्याला पोलिस व्हायचं होतं news image लातूरचे व्यापारी २१ बसेसद्वारे ११०० वारकरी पंढरपूरला मोफत पाठवणार news image लातूरच्या मनसेने पीक विमा मंजूर करावा यासाठी इन्सुरन्स कंपनीसमोर केली निदर्शने news image राज्यभरात स्वाभिमानीचे दूध बंद आंदोलन news image संभाजी भिडे यांनी केलेल्या मनुच्या समर्थनानंतर 'मनुस्मृति' पुस्तकाची विक्री वाढली news image छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या उंचीवरुन विधानसभेत मोठा गदारोळ news image गुजरातहून येणार्‍या दुधाच्या गाड्या आंदोलकांनी अडवल्या news image राज्यातील दुधाचे बंद पाडण्यासाठी अमूलचे दूध, हे दूध घेऊ नका, राजू शेट्टी यांचे आवाहन news image दूध आंदालनामागे कोणताही राजकीय हेतू नाही: राजू शेट्टी news image 'वन नेशन, वन इलेक्शन'ला रजनीकांत यांचा पाठिंबा

HOME   लातूर न्यूज

जिल्हा परिषदेने केला जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार

लोकमत परिवाराच्या वतीने प्रॉमिसिंग आयएएस पुरस्कार!

जिल्हा परिषदेने केला जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार

लातूर: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना लोकमत परिवाराच्या वतीने प्रॉमिसिंग आयएएस हा पुरस्कार देण्यात आला याबद्दल जिल्हापरिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना लोकमत परिवाराच्यावतीने सन्मानित करण्यात आले. या माध्यमातून लातुरात काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी श्रीकांत यांना सन्मानित करुन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहिदास वाघमारे, राजू कांबळे यांची यावेळी उपस्थिती होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा सत्कार केला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेचा वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामे व जनतेसाठी केल्या जाणाऱ्या कार्याची चर्चा झाली. उपाध्यक्ष तिरुके यांनी जिल्हा परिषद शाळेचा पट वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. शासनाकडून जिल्हा परिषदेला विकास कामांसाठी दिला जाणारा निधी परत जाऊ नये यासाठी विकास कामे गतीने करण्याबाबत याबाबत चर्चा झाली. या कामांसाठी शासनाकडून येणारा निधी तात्काळ वर्ग करुन देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. शिक्षण, बांधकाम, आरोग्य विभागा अंतर्गत केली जाणारी कामे आणि त्यासाठी लागणारा निधी याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी ग्वाही दिली. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


Comments

Top