logo
news image पाच राज्यात कॉंग्रेस आघाडीवर news image मोदी सरकारच्या विरोधात एकवटले २१ विरोधी पक्ष news image विजय माल्ल्याला पाठवा परत भारतात, लंडन कोर्टाचा आदेश news image लातुरच्या न्यायालयाच्या परिसरात थुंकणार्‍यावर लगेच खटले, ८० सीसीटीव्ही कॅमेरे news image कर्नाटकात लिंगायतांना अल्पसंख्याचा दर्जा देण्यास न्यायालयाचा नकार news image आरक्षणासाठी लातूरचा लिंगायत समाज पुन्हा भेटणार मुख्यमंत्र्यांना news image लोदगा येथे होणार हवामान बदलांचा अभ्यास news image भाजपाच्या जाहीरनाम्याचे धनगर कर्यकर्त्यांनी केले उदगीरमध्ये दहन news image दुकानफोडी प्रकरणी लातुरात दोघांना अटक, दोन दुचाकी जप्त news image मुंबई-बीदर धावत्या रेल्वेत महिलेने दिला बाळाला जन्म, लातुरच्या अधिसेविकेने केली मदत news image लातूर परिसरातील ६० खडी केंद्रांची करणार ड्रोनद्वारे मोजणी news image लातूर शहरातील तीन आधार केंद्रे सुरु, बाकी बंद news image पंचायत समिती, तहसील, मनपा, बॅंका आणि जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार बाकी केंद्रं news image मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम, तेलंगणा, राजस्थानात आस्तित्व टिकवण्याचे कॉंग्रेसला आव्हान news image संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात news image यमुनेत नाव बुडाल्याने मराठवाड्यातील तिघांचा मृत्यू

HOME   लातूर न्यूज

पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात धीरज देशमुख यांचे श्रमदान

सावरगावात युवकांना प्रेरणा, लोकसहभागही वाढला

पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात धीरज देशमुख यांचे श्रमदान

लातूर: देवणी तालुक्यातील सावरगाव या गावी प्रसिध्द अभिनेते अमीर खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातुन सामाजिक परिवर्तनाचे तुफान आपल्या कार्यातून महाराष्ट्र भर निर्माण केले आहे. या तुफानात जिल्हा परिषद सदस्य धीज देशमुख यांनी सहभागी होऊन श्रमदान केले. युवकांनी मोठ्या प्रमाणात अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील सर्व गाव या उपक्रमात सहभागी झाले असून पाणी फाऊंडेशनच्या वतीने पाण्याच्या पर्यावरणाच्या बाबतीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या सावरगावकर ग्रामस्थांना प्रोत्साहित करुन त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्यासाठी धीरज देशमुख आवर्जुन उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांसोबत श्रमदान करुन त्यांच्या कार्याची व नियोजनाची माहिती धिरज देशमुख यांनी घेतली विविध पातळीवरील १०० गुणांच्या या स्पर्धेत जे कांही तांत्रिक मार्गदर्शन व अन्य स्पर्धेत जे कांही सहकार्य हवे आहे ते आपण देवू असे आश्वासन देऊन गावकऱ्यांच्या एकीचा व ही स्पर्धा जिंकण्याच्या जिद्दीचा आपणास अभिमान असुन सावरगाव वॉटर कप ही स्पर्धा जिंकेल असा आत्मविश्वास आपणास असल्याचे याप्रसंगी धीरज देशमुख म्हणाले. पाणी फाऊंडेशनची टीम महाराष्ट्रात पाण्याच्या बाबतीत जे कार्य करीत आहे ते परिणामकारक असून या कार्याबद्दल धीरज देशमुख यांनी आमीर खान व त्यांच्या संपुर्ण टीमचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले. सावरगावातील श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांना त्यांचे काम सहजतेने करता यावे यासाठी देशमुख यांनी स्वनिधीतून ५० टोपली, ५० खोरे व १० टिकाव दिले आहेत. या मदतीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने धिरज विलासराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडूसाहेब पडीले, २१ शुगर चे मुख्य समन्वयक विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, विलास बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते, राजेसाहेब सवई, बाळकृष्ण माने, बादल शेख, श्रीनिवास शेळके, व्यंकट पिसाळ, विजय निटूरे, प्रदिप राठोड, रत्नाकर केंद्रे, विनोद सुडे, अजित बेळकुने, गजानन भोपनीकर, अहमद सरोवर, निखिलेश पाटील, महेश अन्नदाते, विजयकुमार चवळे, शेख अहमद, महेशकुमार भंडे, अमोल कांडगीरे, पंडीत ढमाले, पंडीत ढगे, काशिनाथ बंडगिरे, सतिष हलवाई, रघुनाथ शिंदे, अविनाश हेरकर, उदय मुंडकर, शरद पाटील, संदीप पाटील, ग्रामसेवक सावरे, जाधव, गटविकास अधिकारी आकेले, सरपंच श्रीमती बोरोळे ताई तसेच गावातील ग्रामस्थ व कार्येकते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top