HOME   लातूर न्यूज

बर्फात टाका खाद्य रंग, अखाद्य रंग नको


बर्फात टाका खाद्य रंग, अखाद्य रंग नको


लातूर: जिल्हयातील सर्व अखाद्य बर्फ उत्पादक, वितरक ठोक –विक्रेते व किरकोळ विक्रेत यांनी अखाद्य बर्फात खाद्यउयोगासाठी वापरण्यात येणारा रंग Indigo Carmine किंवा Brillant Blue FCF रंग अत्यल्प प्रमाणात निळसर रंगांची छटा निर्माण होईल एवढा (किमान 10 वी पी. पी. एम ) खाद्य रंग टाकणे बंधनकारक आहे. अखाद्य बर्फाच्या उत्पादकांनी उत्पादित बर्फामध्ये खाद्यरंगाचा वापर केला नाही तर सदरचा बर्फ खाद्य बर्फ समजून तो अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्य कार्यकक्षेत समजला जाईल. महाराष्ट्र राज्यात बर्फाचे उत्पादन करताना खाद्य दर्जाच्या बर्फात कुठलाही रंग टाकू नये. तसेच खाद्य बर्फ विक्री व खाद्य पदार्थात वापरण्यात येणार बर्फ, बर्फ उत्पादक, साठा, वितरण, वाहतुक व विक्री यावर अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य हे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नियम व नियमन 2011 तील तरतुदीनुसार कारवाई होईल, असे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


Comments

Top