HOME   लातूर न्यूज

धर्म मान्यतेशिवाय लिंगायतांचे आंदोलन थांबणार नाही

लिंगायत धर्म मान्यतेस विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना सत्ता मिळू देणार नाही!


धर्म मान्यतेशिवाय लिंगायतांचे आंदोलन थांबणार नाही

लातूर: संपूर्ण भारत देशातील लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यात यावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी लिंगायत धर्मियांची लोकशाही मार्गाने आंदोलने चालू आहेत. लिंगायत धर्म मान्यतेस विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना लिंगायत धर्मियांचा तीव्र विरोध राहील. तीन राज्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेस विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना आपला समाज कदापि सत्तास्थानी विराजमान होऊ देणार नाही, असा इशाराही शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी रविवारी लातुरात पत्रकारांशी बोलतांना दिला.
संपूर्ण भारत देशातील लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यात यावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी लिंगायत धर्मियांची लोकशाही मार्गाने आंदोलने चालू आहेत . या आंदोलनांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसताच याच समाजातील कांही विघ्नसंतोषी मंडळी आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशावेळी आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना समाजाने आंदोलनातून खडे वेचल्याप्रमाणे बाजूला सारावे. देशपातळीवर चालणारे हे आंदोलन आता कोणत्याही परिस्थितीत धर्म मान्यतेशिवाय थांबणार नाही, असे सांगून डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, या आंदोलनांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसताच याच समाजातील कांही विघ्नसंतोषी मंडळी आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशावेळी आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना समाजाने आंदोलनातून खडे वेचल्याप्रमाणे बाजूला सारावे. देशपातळीवर चालणारे हे आंदोलन आता कोणत्याही परिस्थितीत धर्म मान्यतेशिवाय थांबणार नाही. आपले समाज बांधव राष्ट्राने हिंदू तर धर्माने लिंगायत आहेत. आमच्या शरीरात रक्ताचा थेंब न थेंब असेपर्यंत लिंगायत धर्मासाठीचा हा लढा चालूच राहील. कोणत्याही परिस्थितीत धर्म मान्यतेशिवाय समाज शांत बसणार नाही. याकामी विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना सत्तेतून खाली खेचण्याचा खणखणीत इशाराही डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी दिला.


Comments

Top