logo
news image बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज झाले भूमिपूजन news image बाळासाहेबांना लातुरच्या शिवाजी चौकात अभिवादन news image व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत लातुरात ०१ लाख नागरिकांचे प्रबोधन news image लातुरातील परप्रांतीय मजुरांची नोंदणी करा- मनसे news image सरकारने काही न केल्यास सभासद आणि शेतकरी घेणार किल्लारी कारखान्याचा ताबा news image भाजपा-शिवसेना युती होणारच- नारायण राणे news image मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची याचिका मागे news image मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे news image परत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही- नारायण राणे news image आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती news image सुप्रिया सुळे आणि उदयनराजे या दोघांची उमेदवारी निश्चित news image पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापिठाचा दर्जा news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचं आज हस्तांतरण news image इसिस संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरुन मुंब्रा आणि औरंगाबादेतून आठजण ताब्यात news image ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांचं तोंडी आश्वासन news image ठाकरे चित्रपटाचा दिल्लीतील खास प्रदर्शनाला पंतप्रधान आणि दिग्गज उपस्थित राहणार news image एटीमनंतर आता पासपोर्टलाही चीप बसवणार

HOME   लातूर न्यूज

आमीर खान यांनी घेतली देशातील पहिल्‍या स्‍वच्‍छतेची भेट

स्‍वच्‍छता उपक्रमांचे केले कौतूक, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांची धडपड

आमीर खान यांनी घेतली देशातील पहिल्‍या स्‍वच्‍छतेची भेट

लातूर: पाणी फाऊंडेशनच्‍या वतीने राज्‍यभर वॉटर कॅप स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून जलक्रांती केली जात आहे. यात औसा तालुक्‍यातील फत्‍तेपुर या गावानेही भाग घेतला आहे. त्‍यात सहभागी होण्‍यासाठी गावक-यांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी सिने अभिनेते आमीरखान व अलिया भट आले असता श्रमदानानंतर गावकरी व लातूर येथून आलेल्‍या स्‍वयंसेवकांसह त्‍यांनी संवाद साधला. यावेळी लातूर येथील दांमपत्‍याने स्‍वच्‍छता उपक्रमांना प्रेरीत होवून स्‍वतःच्‍या मुलीचे नाव स्‍वच्‍छता असे ठेवले असून ती देशातील पहिली स्‍वच्‍छता आहे हे समजताच त्‍यांना बोलावून घेवून स्‍वच्‍छताची भेट घेतली व तिच्‍या माता पित्‍यांचे कौतूक केले, आस्थेवायीकपणे चौकशी केली. यावेळी उपस्‍थीत असलेले मनपा नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी त्‍यांना लातूर मधील स्‍वच्‍छता उपक्रमांची व कच-यापासून होत असलेल्‍या खत निर्मीती प्रकल्‍पाची माहिती दिली व खत भेट स्‍वरूपात त्‍यांना दिला. तसेच त्‍यांच्‍या सत्‍यमेव जयते या मालिकेतून याची प्रेरणा मिळाल्‍याची माहीती दिली. अभिनेते आमीर खान व अलिया भट यांनी त्‍यांच्‍या या उपक्रमाचे कौतूक केले व आनंद व्‍यक्‍त केला. यावेळी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्‍या समवेत स्‍वच्‍छतेचे माता पिता मोहन कुरील, काजल कुरील, सुभाष पंचाक्षरी, चेतन कोल्‍हे, प्रा. ओमप्रकाश झुरळे, रेवन काडोदे उपस्थित होते.


Comments

Top