HOME   लातूर न्यूज

नांदेड-पनवेल रेल्वेला दोन नवे वातानुकूलित डबे

बीदर-मुंबई गाडीवरचा प्रवाशांचा ताण कमी होणार?


नांदेड-पनवेल रेल्वेला दोन नवे वातानुकूलित डबे

लातूर: प्रवाशांची धावपळ थांबण्यासाठी नांदेड-पनवेल या लातूर स्थानकावरून धावणार्‍या रेल्वेला दोन वातानुकूलित नवीन डबे जोडण्यात आले आहेत. लातूर येथे झालेल्या रेल्वे बोगी कारखाना उद्घाटन कार्यक्रमात खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे ही मागणी केली होती. अवघ्या एक महिन्यातच त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे. लातूर-मुंबई रेल्वेचे बिदरपर्यंत विस्तारीकरण झाल्याने लातूरच्या प्रवाशांचे हाल होत आहेत. बीदर - मुंबई रेल्वेचे आरक्षण लवकर मिळत नाही. हा ताण कमी व्हावा, यासाठी मागील एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या नांदेड-कुर्ला एक्सप्रेसला दोन नवीन डबे जोडण्याची मागणी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे लातूरच्या कार्यक्रमात केली होती. लातूरच्या प्रवाशांना आरक्षण मिळत नसल्याने त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी डॉ. गायकवाड यांनी ही मागणी केली होती. डॉ. गायकवाड यांच्या या मागणीची दखल घेऊन रेल्वेमंत्री पीयूष गोयल सदर रेल्वेला ०१ टिअरचा एक व ०२ टिअरचा एक असे दोन नवीन वातानुकूलित डबे जोडले आहेत. यामुळे लातूरच्या प्रवाशांची सोय होणार आहे. या रेल्वेमुळे मुंबईसह पुण्याच्या प्रवाशांना फायदा होणार आहे. बीदर-मुंबई रेल्वे आरक्षणावर येणारा ताण यामुळे कमी होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होऊ शकते.


Comments

Top