logo
news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image वाजपेयींच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image साडेसात वाजता वाजपेयी यांचे पार्थिव घरी नेणार news image राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत पाटील यांचा आज वाढदिवस news image सनी लिओनी आणि तिचा पती दत्तक निशाला घेऊन लातुरला येणार news image हिंसाचारात मराठा मोर्चाचा हात नाही- औरंगाबाद पोलिस news image शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्यचक्र news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेल्वेने केला काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल news image माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्‍वास news image माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन news image मराथा आरक्षणासाठी औरंगाबादेत ध्‍वजारोहण कार्यक्रमातच तिघांचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न news image आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिला राजीनामा, केजरीवालांनी नाकारला

HOME   लातूर न्यूज

रमेश कराडांचा अर्ज मागे, बंडखोर जगदाळेंना दोन्ही कॉंग्रेसचा पाठिंबा

राजकारणातल्या दुकानदारीचा अनोखा अनुभव, नेते एकच, कार्यकर्ते डोके फोडून घेतात!

रमेश कराडांचा अर्ज मागे, बंडखोर जगदाळेंना दोन्ही कॉंग्रेसचा पाठिंबा

लातूर: लातूर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीतून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला. या पार्श्वभूमीवर नळदुर्गचे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अशोक जगदाळे यांना दोन्ही कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या घडामोडीचं समर्थन करीत जगदाळेंना मतदान करण्याचं आवाहन केलं. या घटनाक्रमाच्या मागे कराडांना काय आमीश दिलं गेलं असेल ते अजून गुलदस्त्यात आहे. या निवडणुकीच्या निकालाअंती पंकजा मुंडे सरस ठरल्या की राष्ट्रवादी याचा अर्थ लावता येऊ शकतो. आजच्या घडीला पक्षांच्या निर्णयाला अंतिम मानत एकमेकांची डोकी फोडणार्‍या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या काळजाचं मात्र नक्कीच पाणी झालं असणार!
आधी राष्ट्रवादी पुन्हा भाजपा, पुन्हा राष्ट्रवादी असा प्रवास करणारे, मागच्या निवडणुकीत निसटता पराभव स्विकारणारे रमेश कराड यांना पुढे भवितव्य काय असा प्रश्न नक्कीच पडला असणार. पक्ष अदलाबदली अन अर्ज मागे घेणे यामुळे सामान्यजनात मात्र त्यांची नाचक्की झाली आहे एवढं मात्र खरं आहे. असल्या बदलाबदलीवर ज्येष्ठ नेते मात्र बोलत नाहीत. ते का बोलत नाहीत असा प्रश्न सामान्यजणांना पडला आहे. याबाबत अजून तरी कॉंग्रेसची प्रतिक्रिया आली नव्हती.


Comments

Top