HOME   लातूर न्यूज

इथेनॉल निर्मितीचे धोरण जाहीर करा


इथेनॉल निर्मितीचे धोरण जाहीर करा

लातूर: थेट उसापासून इथेनॉल निर्मितीचे धोरण केंद्र शासनाने जाहीर करावे, अशी मागणी जैवइंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई व महीला आघाडीच्या राज्याध्यक्ष सुजाता देसाई यांनी पंतप्रधान तसेच कृषी मंत्र्यांची भेट घेऊन केली आहे. २३ ते २७ एप्रिल या कालावधीत जैवइंधन शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा दिल्ली दौरा होता. या दौर्‍यात पंतप्रधान, वित्तमंत्री, अर्थमंत्री, कृषीमंत्री तसेच केंद्रीय महामार्ग मंत्र्याच्या कार्यालयाला भेट देऊन थेट उसापासून इथेनॉल निर्मितीचे धोरण शासनाने जाहीर करावे, अशी मागणी देसाई यांनी केली. मंत्र्यांनी लवकरच थेट उसापासून इथेनॉल निर्मितीचे आश्वासन दिले असल्याचे देसाई म्हणाले. आज अखेर १२० लाख टन साखर अतिरीक्त आहे. बाहेर देशात साखरेचे दर प्रती किलो २१ ते २३ रूपये आहेत. त्यामूळे साखर कारखान्यांकडून साखर निर्यातीसाठी प्रती टन १० हजार रूपये अनुदानाची मागणी केली जात आहे. निर्यातीला एवढे अनुदान देऊन कारखान्याच्या कोणत्या अर्थशास्त्रात हे गणीत बसते, असा सवाल जैवइंधन शेतकरी संघटनेचे मंत्रीमहोदयांना दिलेल्या निवेदनात केला आहे.


Comments

Top