logo
news image आज पेट्रोल ११ तर डिझेल २४ पैशांनी वाढले news image भक्तांच्या तक्रारीवरुन मुंबईच्या लालबाग गणपतीसाठी सरकार नेमणार समिती, अनागोंदीवर उपाय news image दिल्लीत महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग, दानवे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक news image गडकरींविरोधात लढण्यासाठी स्पर्धा news image शिवस्मारकाच्या कामाला २४ ऑक्टोबरला सुरुवात news image नगर-नाशिक धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडणार news image लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या महिलेवर एमजे अकबर यांनी दाखल केला खटला news image महिलांचा आदर राखा, मीटू प्रकरणी लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया news image उस्मानाबादेत दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या अर्जून खोतकरांना राष्ट्रवादेच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव news image वो नीच आदमी है, शशी थरुरांबद्दल सुब्रण्यम स्वामी यांचे वक्तव्य news image गुजराती माणसं हुशार असतात हे खरेच आहे, ते काय करतात याचा अभ्यास केला पाहिजे- राज ठाकरे news image साजिद खानला फिल्म अ‍ॅंड टेलीव्हिजनची नोटीस, तीन महिलांनी केली होती तक्रार news image पुण्यात महालक्ष्मी मंदिरात ३०० अनाथ मुलींचं पूजन

HOME   लातूर न्यूज

ग्रामीण भागातही होणार कचर्‍यापासून खतनिर्मिती

जिल्हा परिषद सीईओंसह ५० सरपंच व ग्रामसेवकानी दिली प्रभाग ५ मधील खतनिर्मिती प्रकल्पास भेट

ग्रामीण भागातही होणार कचर्‍यापासून खतनिर्मिती

लातूर: शहरातील प्रभाग ५ चे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सर्वत्रच नावाजला जात आहे. प्रभागातील सुमार ४५००
घरांमधून दररोज एकत्र केल्या जाणार्‍या ०३ टन ओल्या कचऱयापासून निर्मित झालेला खत थेट बाजारपेठेत विक्री करत यशस्वी ठरलेला हा प्रकल्प महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकल्पास औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, अश्या मनपा व नगरपरिषद अधिकारी व सदस्यांनी भेटी दिल्या आहेत, आता इतरत्रही या प्रकल्पाचे अनुकरण होताना दिसून येत आहे. अशातच लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ डॉक्टर विपीन इटनकर यांचा प्रयत्नातून आता ग्रामीण भागातही ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील दहा तालुक्यातील गावांची निवड करण्यात आली आहे तेथील बीडीओ, सरपंच व ग्रामसेवक याना हा प्रकल्प समजावून घेता यावा व याची तांत्रिक माहिती मिळावी यासाठी त्यांनी प्रत्यक्ष स्थळ भेटी सुरू केल्या आहेत याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ इटनकर, जिल्ह्यातील सर्वच तालुक्याचे बीडिओ, निवडक ५० गावांचे सरपंच, ग्रामसेवक यांनी शहरातील प्रभाग ०५ मधील खतनिर्मिती प्रकल्पास नुकतीच भेट दिली व या खत प्रकल्पाची माहिती करून घेतली. यावेळी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी तांत्रीक माहितीसह या खत निर्मिती प्रकलापाच्या उभारणी संदर्भात व याच्या यशस्वितेत मागच्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा सकारात्मक सहभाग घेतला तर घनकचरा व्यवस्थापन करणे अतिशय सोपे असल्याचेही विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले. शहरांच्या तुलनेने ग्रामीण भागांमध्ये घनकचरा व्यवस्थापन बाबत अनेक अडचणी असून त्यावर मात केली तर त्याचा फायदा हा ग्रामीण भागातील लोकांना होऊ शकतो तसेच शहरांच्या तुलनेने ग्रामीण भागामध्ये निर्मित झालेल्या खताला बाजारपेठही सहजतेने उपलब्ध होऊ शकते त्यामुळे ग्रामीण भागात अशा पद्धतीची जास्तीत जास्त प्रकल्प उभारले जावेत असा मनोदय जिल्हा परिषदेचे सीईओ डॉक्टर विपीन ईटनकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाभरातून आलेले सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जनाधार संस्थेचे संजय कांबळे लातूर मनपाचे स्वच्छता निरीक्षक मुनिर शेख, अकबर शेख, सुभाष पंचाक्षरी, महादेव धावारे, स्वयंप्रकाश वैरागे, रेवन काडोदे इत्यादी उपस्थित होते.


Comments

Top