logo
news image औरंगाबादेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने दिला चोप news image मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मुखाग्नी news image अटलजींनी केला अलविदा, अंत्यसंस्कार झाले news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

HOME   लातूर न्यूज

रवींद्र जगताप प्रकरणी आ. अमित देशमुख यांनी केला निषेध

लातूरात पत्रकारास अवमानकारक वागणूक खेदजनक, सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

रवींद्र जगताप प्रकरणी आ. अमित देशमुख यांनी केला निषेध

लातूर: लातूर जिल्ह्यात राजकीय आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात सौहार्दपूर्ण संबंधाची परंपरा असताना, बुधवारी १६ मे रोजी आपले कर्तव्य बजावत असलेल्या पत्रकार रवींद्र जगताप यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून अपमानकारक वागणून दिली गेली. हा प्रकार अत्यंत खेदजनक असल्याची प्रतिक्रिया अखिलल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्व्भूमीवर लातुरातील भाजपचे नगरसेवक बुधवारपासून सहलीवर गेले आहेत. लातूर शहरात विविध भागात कचरा, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट यासंदर्भाने अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असताना महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक सहलीवर जाणे हा बातमीचाच विषय आहे. सजग पत्रकार म्हणून त्यासंबधीचे चित्रीकरण करण्यास गेलेल्या रवींद्र जगताप यांच्याशी भाजप पदाधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले, गचांडी धरुन बाहेर काढले, त्यांची मानहानी केली अशी तक्रार त्यांनी केली आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून तो निषेधार्हही आहे. लातूर जिल्ह्याच्या परंपरेत अशा प्रकारच्या घटना पूर्वी घडलेल्या नाहीत. त्या भविष्यातही घडू नयेत याची जबाबदारी सर्व राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी घेणे गरजेचे आहे असेही आमदार देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


Comments

Top