logo
news image औरंगाबादेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने दिला चोप news image मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मुखाग्नी news image अटलजींनी केला अलविदा, अंत्यसंस्कार झाले news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

HOME   लातूर न्यूज

लोकनेते विलासरावांसाठी बाभळगावात प्रार्थना सभा

लोकनेते विलासरावांसाठी बाभळगावात प्रार्थना सभा

लातूर: शनिवारी, २६ मे रोजी सकाळी ९ वाजता विलासबाग बाभळगाव येथे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची ७३ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने सामुहिक प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांनी गावचे सरपंच, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री या पदावर काम करताना महाराष्ट्र आणि देश पातळीवर नेतृत्व गुणांचा ठसा उमटविला. अशा या लोकनेत्याची जयंती कॉग्रेस पक्ष व विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने साजरी होणार आहे. बाभळगाव येथील विलासबाग येथे २६ मे रोजी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ०९ वाजता डॉ. राम बोरगावकर आणि कलाकारवृंद स्वरवंदना कार्यक्रम सादर करणार आहेत. ०९.४५ वाजता भजन होईल. त्यानंतर ०९.५५ पासून पुष्पांजली अर्पण केली जाईल. या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.


Comments

Top