logo
news image औरंगाबादेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने दिला चोप news image मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मुखाग्नी news image अटलजींनी केला अलविदा, अंत्यसंस्कार झाले news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

HOME   लातूर न्यूज

२९ मे रोजी गनिमी कावाची पाणी परिषद

राजेंद्रसिंह राणा, डॉ जनार्दन वाघमारे, देसरडा, दत्ता शेरकर राहणार उपस्थित

२९ मे रोजी गनिमी कावाची पाणी परिषद

लातूर, २३ : गनिमीकावा संघटनेकडून मागील तिन चार वर्षांपासून दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने गनिमीकावा संघटनेने याही वर्षी ‘चला, मराठवाडा वाळवंट होण्यापासून वाचवू या...!’ हे ब्रिदवाक्य घेऊन पाणी परिषदेचे आयोजन मंगळवार २९ मे २०१८ रोजी सायं. ५.३० वाजता सभागृह, दयानंद कॉलेज, बार्शी रोड, लातूर या ठिकाणी करण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी मराठवाड्यासह सबंध राज्याला दुष्काळाला सामोरे जावे लागले होते, लातूरकरांना तर रेल्वेच्या पाण्याने तारले. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत सुमारे २० हजार कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च झाला आहे, तरीही ७३ तालुक्यांतील सुमारे १० हजार गावे पाण्यासाठी वणवण भटकताना दिसतात. पाण्याचा अपव्यय, शेतीसाठी होणारा पाण्याचा गैरवापर, जास्त पाणी लागणाऱ्या उसाचे वाढते क्षेत्र, वाढणारी लोकसंख्या अशा विविध कारणांमुळे पुढील ५० वर्षांत मराठवाड्याचे वाळवंट होईल अशी अस्वस्थ करणारी भिती अनेक जलतज्ञांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. त्यामुळे या विषयाची कारणे शोधून त्यावर शाश्वत उपाययोजनांची सविस्तर चर्चा करण्यासाठी, देशात अगदी वाळवंटी प्रदेश म्हणून परिचीत असलेल्या राजस्थान सारख्या प्रदेशाला जलमय करणारे जलपुरुष, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतज्ञ मा.श्री. राजेंद्रसिंह राणा हे या पाणी परिषदेचे उद्घाटक म्हणून राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ विचारवंत मा.श्री. जनार्दन वाघमारे हे राहणार आहेत व या पाणी परिषदेसाठी प्रमुख उपस्थिती प्रसिध्द जलतज्ञ मा.श्री.डॉ.एच.एम देसरडा, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.डॉ. दत्ता शेरकर, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष मा.श्री. अनिल पाटील, परभणीचे मा.श्री. सुभाष जावळे, गिरगाव मुंबईचे मा.श्री. अवधुत चव्हाण राहणार आहेत. तरी या पाणी परिषदेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी, शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन गनिमीकावा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड यांनी केले आहे.


Comments

Top