HOME   लातूर न्यूज

स्वच्छंदी आयुष्यासाठी पोटांच्या तक्रारीपासून कायमची मुक्ती

गुगळे रुग्णालयाच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या मोफत पोट विकार तपासणी


स्वच्छंदी आयुष्यासाठी पोटांच्या तक्रारीपासून कायमची मुक्ती

लातूरः ५५ वर्षापासून लातुरकरांच्या सेवेत कार्यरत असलेले गुगळे हॉस्पिटल व एन्डोस्कोपीमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. दिपक गुगळे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. मेघना गुगळे व सनशाईन हॉस्पिटल, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांच्या सेवेसाठी जागतिक पचन आरोग्य दिनानिमीत्त (World Digestive Health Day) पोटाच्या आजारांचे मोफत तपासणी शिबीर लातुर मंगळवार २९ मे २०१८ रोजी सकाळी ११ ते सायं ०२ यावेळेत गुगळे हॉस्पिटल जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर, लातूर येथे आयोजित केले आहे. या शिबीराचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
मानवाच्या मूळ आजाराची सुरुवात ही पोटाच्या आजारापासून सुरु होते. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे व जंकफुडच्या अती सेवनामुळे या आजाराची सुरुवात होते. पोटाच्या आजाराचे अचूक निदान न झालेने रुग्ण त्रस्त होतात. अशा रुग्णांसाठी एन्डोस्कोपीद्वारे पोटाच्या आजाराचे निदान गैस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी या नाविन्यपूर्ण उपचार पद्धतींद्वारे आता केले जात आहे. आयुष्यात नव्या स्मृतींसाठी पोटांच्या विकारांपासून मुक्ती मिळविणे गरजेचे असते. गैस्ट्रोस्कोपी या प्रकारामध्ये अन्ननलिका, जठर व लहान आतड्याचे निरीक्षण केले जाते. पोटदुखी, अॅसिडीटी, मळमळ-उलट्या, भूक मंदावणे, वजन कमी होणे, रक्ताची उलटी होणे, शरीरातील रक्त कमी होणे, गिळण्यास त्रास होणे ही लक्षणे जाणवल्यास गैस्ट्रोस्कोपी केली जाते. कोलोनोस्कोपी म्हणजे मोठ्या आतड्याची दुर्बिणीव्दारे तपासणी करणे, शौचास रक्त जाणे, रक्ताचे जुलाब होणे, बध्दकोष्ठता, पोटदुखणे, वारंवार जुलाब होणे, या लक्षणांसाठी कोलोनोस्कोपी केली जाते. अनवधानाने लहान मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनीही गिळलेल्या विविध वस्तू एन्डोस्कोपीने काढून पोटाची मोठी शस्त्रक्रिया टाळली जाऊ शकते.
गुगळे हॉस्पीटलची स्थापना मे १९६२ रोजी झाली असून यंदा ५५ वर्षे पूर्ण होत आहेत व याच महिन्यात असलेल्या जागतिक पचन आरोग्य दिनाचे औचित्य साधून या मोफत आरोग्य शिबिरामध्ये सनशाईन हॉस्पिटल, हैदराबाद चे संचालक विश्वविख्यात पोटविकारतज्ञ डॉ. नागार्जुनकुमार DM, PGI (Gastro.) व डॉ. रमाकांत DM (Gastro., डॉ. दिपक गुगळे (M.S.) हे तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरामध्ये लिव्हरचे आजार (कावीळकॅन्सर इ.), पित्ताशयाचे खडे, पोटाचे आजार, स्वादुपिंडाचे आजार व त्याचे उपचार या संदर्भातील तपासणी व मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. या जागतिक पचन आरोग्य दिनानिमीत्त आयोजित केलेल्या मोफत तपासणी शिबिरामध्ये गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, रक्ततपासणी, सोनोग्राफी, सिटीस्कॅन अल्पदरात करण्यात येणार असून या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. गिरीश मैदरकर, डॉ. संतोष कवठाळे, डॉ. राजेश दराडे, डॉ. संजय वारद, डॉ. संदीप कवठाळे, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. सतीश देशमुख, डॉ. चेतन सारडा, डॉ. अजय जाधव, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. उदय मोहिते, डॉ. उमेश कानडे, डॉ. सतीश बिराजदार, डॉ. जाधव पी.के., डॉ. सुबोध सोमणी, डॉ. शिवाजी काळगे, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. अनिल सोनवणे, डॉ. विश्रांती भारती, डॉ. राजेश एनाडले, डॉ. दीपक गुगळे, डॉ. मेघना गुगळे यांनी केले आहे


Comments

Top