logo
news image अपूर्वा यादव खून प्रकरणी मुख्य आरोपी अमर शिंदे याला अटक news image लातुरातील अपूर्वा यादव खून प्रकरणी दोन तपास पथके रवाना, चार संशयितांना अटक news image प्रकरण गुंतागुंतीचे, अपूर्वाने एका तरुणाला आत्महत्येस केल्याचा आरोप news image उजनीच्या पाण्यासाठी फेर प्रस्ताव पाठवा, लातूर भेटीत राज्यपालांची सूचना news image मांजरा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात news image अटल आरोग्य शिबिरात ३५०० डॉक्टरांची जेवणाची सोय करणार्‍या लातूर व्यापारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक news image शिवसेनेचे अभय साळुंके यांनी उजनीचे पाणी आणून सिध्देश्वराला केला अभिषेक news image आजपासून राज ठाकरे दहा दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर news image शबरीमाला मंदिरात महिलांसह सर्वांना प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश news image महिलांना प्रवेश दिला तर आत्महत्या करु, अनेक भक्तांची धमकी news image संघाच्या नागपूर दसरा पूजेला विरोध नाही, मात्र संघाच्या बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याला विरोध- प्रकाश आंबेडकर news image संघवाल्यांना बेकायदा शस्त्र प्रदर्शन करण्यापासून रोखले नाही तर न्यायालयात दाद मागू- आंबेडकर यांचा इशारा news image महिलांना संधी दिली तर देशाचा विकास गतीने होतो हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज- राज्यपाल सी. विद्यासागर राव news image लातुरात राजर्षी शाहू महाविद्यालयातील ‘उच्चशिक्षणातील संधी’ या विषयावरील चर्चासत्राचे राज्यपालांनी केले उद्घाटन news image लातूर येथे विशाल नगर भागात अनंत यादव यांच्या मुलीची हत्या, दोन मोबाईल घेऊन मारेकरी पसार news image ९१ देशांतील २२ हजार जणांच्या सर्वेक्षणात महिलांना संधी दिलेले उद्योग नफ्यात चालतात- राज्यपाल

HOME   लातूर न्यूज

पत्रकाराने केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प

बाळ होळीकरांचा पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त अनोखा निर्णय

पत्रकाराने केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प

लातूर: लातूर येथील दैनिक लोकमनचे पत्रकार तथा आप पक्षाचे लातूर शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बाळ होळीकर यांनी आपला ५० वा वाढदिवस सोमवार मरणोत्तर देहदानाचा संकल्प करुन साजरा केला. त्यांनी याबाबतचा संकल्प अर्ज जिल्हा शासकीय रुग्णालयात सादर केला. अनेक जण आपले वाढदिवस विविध प्रकारे साजरे करतात, साधी जीवनशैली जगणारे, सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालयाचे सचिव, पत्रकार बाळ होळीकर यांचे जलील शेख आणि नितीन चालक या स्नेहींनी त्यांचा हा ५० वा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. जिल्हा पेन्शनर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव कुलकर्णी, विभागीय वीज तक्रार निवारण मंचाचे सदस्य प्रा. डॉ. सुधीर देशमुख, शिवकुमार बनसोडे, सुधाकर अरसुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्राट अशोक सार्वजनिक ग्रंथालय, हरिभाऊनगर येथे सकाळी १० वाजता त्यांना केक भरवून अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी अशोकराव कुलकर्णी, प्रा. डॉ. सुधीर देशमुख, शिवकुमार बनसोडे, सुधाकर अरसुडे, निवृत्ती शिंदे आदींनी बाळ होळीकर यांच्याच्या कार्याचा गौरव केला. यावेळी बाळ होळीकर यांनी नश्‍वर देहाचा वैद्यकीय विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा म्हणून आपण मरणोत्तर देहदानाचा संकल्प करत असल्याचे सांगून तो अर्ज उपस्थित ज्येष्ठांकरवी भरुन घेतला. जलील शेख यांनी सूत्रसंचालन केले. विक्रांत शंके यांनी आभार मानले. यावेळी अंजली होळीकर, संध्या होळीकर, संकेत होळीकर, आपचे शहर उपाध्यक्ष सुमित दीक्षित, उपाध्यक्ष शाम माने, शिवचंद्र स्वामी, बालाजी जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. दुपारी बाळ होळीकर यांनी मरणोत्तर देहदान संकल्पाचा अर्ज जिल्हा शासकीय रुग्णालयात उप अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर, अनॉटॉमी विभाग प्रमुख डॉ. मंगेश सेलूकर, डॉ. राधेय, खेत्रे यांच्याकडे सादर केला.


Comments

Top