logo
news image लातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील news image लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद news image लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु news image मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या news image लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण news image लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम news image सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार news image लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय news image अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा news image मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर news image संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी news image ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण

HOME   लातूर न्यूज

इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाला लातुरकरांनी दिला प्रतिसाद

प्रभाग सहा व सात मध्ये विविध उपक्रम, पुनर्भरण, वृक्षारोपण, शोषखड्डे

इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाला लातुरकरांनी दिला प्रतिसाद

लातूर: पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुरू केलेल्या इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या यशस्वीतेसाठी लातूरकर सरसावले असून लातुरकर मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत. लातूर शहरातील प्रभाग सहा व सातमध्ये हे अभियान राबविण्यात आले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वत: सहभागी होत नागरिकांचा उत्साह वाढवला. २५ मेपासून लातूर जिल्ह्यात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान व स्वावलंबन यात्रा राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्याला पाणीदार करण्यासाठी जलपुनर्भरण, शोषखडडे, वृक्षारोपण व स्वच्छता आदी उपक्रम राबविले जात आहेत. प्रत्येक उपक्रमात पालकमंत्री स्वतः सहभागी होत असल्यामुळे जनतेचाही उत्साह वाढला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या निमित्ताने गंजगोलाई परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जुनी कापड लाईन भागात शोषखड्डे घेण्यासाठी श्रमदान करण्यात आले. या भागात पालकमंत्र्यांनी वृक्षारोपणही केले. भुसार लाईन भागात पालकमंत्र्यांच्या हस्ते विंधन विहिरीचे पुनर्भरण करण्यात आले. शाहू चौक परिसरातील भीमनगर येथे विंधन विहिरीचे पुनर्भरण करण्यात आले. बौद्धनगर परिसरात सय्यद खयूम यांच्या घरासमोर वृक्षारोपण करण्यात आले. सय्यद अय्युब यांच्या निवासस्थानी पुनर्भरण करण्यात आले. साळे गल्ली परिसरात शिवाजी धुमाळ यांच्या घरी वृक्षारोपण व विंधन विहिरीचे पुनर्भरण झाले. याच भागात किशन काळे यांच्या घराजवळ असणाऱ्या सार्वजनिक विंधन विहिरीचे पुनर्भरण करण्यासाठी पालकमंत्र्यांनी श्रमदान केले. नगरसेविका ज्योती आवस्कर यांच्या निवासस्थानाजवळ वृक्षारोपण करण्यात आले. मोतीनगर भागात प्रकाश कासट यांच्या घराजवळ सार्वजनिक विंधन विहिरीसाठी पुनर्भरण करण्यात आले. वीर हणमंतवाडी येथील दत्ता बोरुळे यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी वृक्षारोपण करून वृक्ष संगोपनाची जबाबदारी कुटुंबीयांवर सोपविण्यात आली. याप्रसंगी महापौर तथा त्या प्रभागाचे नगरसेवक सुरेश पवार, भाग्यश्री कौळखेरे, ज्योती आवस्कर, अजय दुडिले, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, उपमहापौर देविदास काळे, सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी, चंद्रकांत चिकटे, गणेश गोमचाळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Comments

Top