HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कुणालाही संधी नाही, रवींद्र जगताप यांनी मानले आभार


लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

लातूर: लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर झाली असून या कार्यकारिणीत सर्व मुद्रीत माध्यमातील प्रतिनिधींना संधी देण्यात आली आहे. यात एकही इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधीचा समावेश नाही. मुद्रीत माध्यमाच्या कार्यकारिणी सदस्यांनी पत्रकार संघाच्या आणि पत्रकारांच्या कल्याणाची जबाबदारी उचलून इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींना आराम दिल्याबद्दल लातूर मिडिया क्लबचे समन्वयक रवींद्र जगताप यांनी आभार मानले आहेत.
लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक पहिल्यांदाच धर्मादाय कार्यालयाकडून नुकतीच पार पडली, लोकशाही पध्दतीने संघाच्या घटनेनुसार अध्यक्ष व सरचिटणीस या पदासाठी जिल्ह्यातील पत्रकार सदस्यांमधून मतदान प्रक्रियेने अध्यक्षपदी नरसिंह घोणे तर सरचिटणीसपदी सचिन मिटकरी हे निवडून आले. आज पत्रकार भवन लातूर येथे नूतन अध्यक्ष नरसिंह घोणे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक होवून १९ सदस्यांची कार्यकारिणी सर्वानुमते संमत करण्यात येवून जाहीर करण्यात आली. कार्यकारीणी मध्ये उपाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे महादेव कुंभार, सहसरचिटणीसपदी दै. लोकमत समाचारचे श्रीनिवास सोनी- उदगीर, दै. सकाळचे संगमेश्‍वर जनगावे-चाकूर, कोषाध्यक्षपदी काकासाहेब घुटे तर प्रांत प्रतिनीधी म्हणून त्र्यंबक कुंभार यांची निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये संगम कोटलवार, वामन पाठक, गणेश होळे, रघुनाथ बनसोडे, रोहीदास कलवले, विश्वनाथ काळे, सुनिल हावा, मोहन क्षिरसागर, शेख सय्यद मेहताब, बालाजी पिचारे, वसंत सूर्यवंशी, अत्तार बाबन, दत्तात्रय पाटील व महिला प्रतिनिधी म्हणून चंद्रकला शरद सोनवळकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. या सोबतच पत्रकार संघाचे मार्गदर्शक म्हणून जयप्रकाश दगडे, चंद्रकांत झेरीकुंठे, अरूण समुद्रे, प्रदीप ननंदकर, अभय मिरजकर हे राहतील असे एकमुखी ठरले. लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची गेल्या तीन चार वर्षापासून पत्रकार भवनाची कामे, पत्रकारांच्या समस्या व संघटन ठप्प पडले होते परंतू धर्मादाय कार्यालयामार्फत पहिल्यांदाच निवडणूक होवून सर्व तालुक्याला प्रतिनिधित्व देत कार्यकारिणी सदस्यांची निवड झाल्याने आता कामाला गती मिळेल असा आशावाद बैठकीत व्यक्त करण्यात आला.


Comments

Top