HOME   लातूर न्यूज

वनमंत्र्यांनी केलं वृक्ष संवर्धन पत्रिकेचं वाटप, वृक्षारोपण


वनमंत्र्यांनी केलं वृक्ष संवर्धन पत्रिकेचं वाटप, वृक्षारोपण

लतूर: वन विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन कार्ड वाटपाच्या कार्यक्रम दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे वितरन केलं यावेळी कामगार कल्याण, कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सर्वश्री सुधाकर भालेराव, सुरेश धस, विनायक पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, शैलेश लाहोटी, नागनाथ निडवदे, शैलेश गोजमगुंडे, आदिसह इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, पृथ्वीच्या ४५६ कोटी वर्षाच्या इतिहासात मागील १५० वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणावर वनसृष्टी कमी झाली आहे. औद्योगीक क्रांतीने जगातील ५० टक्के वनक्षेत्र कमी झालेले आहे. देशात महाराष्ट्र व विशेषत: मराठवाड्यातील वनक्षेत्र फारच कमी आहे त्यामुळे वनक्षेत्रात वाढ करुन जीवसृष्टी टिकविण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड कार्यक्रम सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या पुढचं पाऊल इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान असून या अभियानाची जिल्ह्यात सुरु असलेल्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती पालकमंत्री निलंगेकर यांनी दिली. तसेच या अंतर्गत पंचनिष्ठा कार्यक्रमांतील वृक्षरोपण व संवर्धन कार्यक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या ०१ लाख ३० हजार विद्यार्थ्यांना वृक्ष देण्यात येणार असून वर्षाच्या शेवटी त्यांचा अहवाल घेवून विद्यार्थ्यांना चांगले वृक्ष संवर्धनासाठी पाच गुण शिक्षकांकडून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुनगंटीवार व मान्यवरांनी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील वीस विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात वृक्ष व वृक्ष संगोपन पुस्तिका मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले तर आभार रामचंद्र तिरुके यांनी मानले. दयानंद सभागृहाच्या परिसरात वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.


Comments

Top